कोलंबो : भारतीय आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात 5 खेळाडूंनी डेब्यू केला. मागील 40 वर्षांत पहिल्यांदाच भारतीय संघात (Indian Cricket Team) एकाच वेळी पाच खेळाडूंनी पदार्पण केलं आहे. याआधी डिसेंबर 1980 मध्ये असं घडलं होतं. त्यावेळी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात मेलबर्नच्या मैदानात किर्ती आझाद, दिलीप जोशी, रॉजर बिनी, संदीप पाटील आणि तिरुमलाई श्रीनिवासन यांना संघात संधी देण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकाच वेळी संघात संधी देण्यात आलेल्यांमध्ये नितीश राणा, राहुल चहर, चेतन साकरिया, संजू सॅमसन यांच्यासह अष्टपैलू कृष्णप्पा गौथम (Krishnappa Gowtham) याचाही समावेश आहे. दरम्यान या सर्वांमध्ये गौथम हा सर्वात वयस्कर असून त्याने वयाच्या 32 व्या वर्षी संघात पदार्पण केले आहे.
भारतीय संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा गौथम मागील 39 वर्षांतील सर्वात वयस्कर खेळाडू आहे. कृष्णप्पा गौतमने 32 वर्षे 276 दिवसांचा असताना भारताच्या प्लेइंग इलेवनमध्ये जागा मिळवली आहे. याआधी राकेश शुक्ला यांनी 1982 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात चेन्नईमध्ये 34 वर्ष 226 दिवसांचे असताना संघात स्थान मिळवलं होतं. विशेष म्हणजे तोच त्यांचा शेवटंचा सामना देखील ठरला.
32 वर्षीय गौथमने स्थानिक क्रिकेटमध्ये कर्नाटक संघाकडून चांगली कामगिरी केली आहे. 42 प्रथम श्रेणी सामन्यात त्याने 166 विकेट्ससह 1 हजार 45 रन्स केले आहेत. तर 47 लिस्ट ए सामन्यात 70 विकेट मिळवत 558 रन्स केले आहेत. याखेरीज 62 टी-20 सामन्यात 41 विकेट्सह 594 रन्स गौथमच्या नावावर आहेत. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, किंग्स 11 पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स संघाकडून गौथम खेळला आहे.
हे ही वाचा :
PHOTO : IPL गाजवल्यानंतर एकदिवसीय संघात पदार्पण, एकाच वेळी पाच नव्या चेहऱ्यांची भारतीय संघात एन्ट्री
IND vs SL : श्रीलंका संघाविरुद्ध 5 खेळाडूंनी केला डेब्यू, 40 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती
(CSK Player krishnappa Gowtham debuts for indian Cricket team in age of 32)