IPL मध्ये ‘या’ संघाचे गोलंदाज सर्वाधिक यशस्वी, सर्वाधिक पर्पल कॅप जिंकण्याचा मान, वाचा यादी एका क्लिकवर!
इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप दिली जाते. स्पर्धेदरम्यान या कॅपचे मालक बदलत असतात. पण स्पर्धेच्या अखेर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूलाच अखेर हा मान मिळतो.
1 / 5
आयपीएल 2021 चा (IPL 2021) दुसरा सीजन 19 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी मध्येच थांबवलेले हे पर्व पुन्हा सुरु केले जात आहे. युएईमध्ये सुरु होणाऱ्या या पर्वाआधी काही इंटरेस्टींग गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तर तुम्हा सर्वांनाच माहित आहे, की स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते तर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. तर आयपीएळ इतिहासात सर्वाधिक पर्पल कॅप मिळवणारा संघ कोण आणि या यादीत कोण कुठल्या क्रमांकावर हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2 / 5
आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी संघामधील एक म्हणजे चेन्नई सुपरकिंग्स (CSK). याच संघाच्या खेळाडूंनी सर्वाधिक वेळा पर्पल कॅप देखील मिळवली आहे. चार वेळा पर्पल कॅप विनर असणाऱ्या या संघाच्या खेळाडूंमध्ये डीजे ब्रावोने 2013 मध्ये, 2014 मध्ये मोहित शर्माने आणि 2015 मध्ये पुन्हा ब्रावोने ही कॅप जिंकली. तर 2019 मध्ये चेन्नईच्या इम्रान ताहिरने ही कॅप जिंकत सर्वाधिक वेळा कॅप जिंकण्याचा मान मिळवला.
3 / 5
सीएसके पाठोपाठ हैद्राबाद (SRH) संघानेही चार वेळा पर्पल कॅप जिंकली आहे. दोनदा तेव्हा जेव्हाय या संघाचं नाव डेक्कन चाजर्स असं होतं. त्यावेळी 2009 मध्ये आरपी सिंगने आणि 2010 मध्ये प्रज्ञान ओझाने ही कॅफ जिंकली होती. तर सनरायजर्स हैद्राबाद नाव झाल्यावर 2016 आणि 2017 मध्ये भुवनेश्वर कुमारने ही कॅप मिळवली होती.
4 / 5
दिल्लीच्या (DC) संघानेही दोनदा पर्प कॅप मिळवली आहे. विशेष म्हणजे दोन्ही वेळी दिल्लीला हा मान मिळवून देणारे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू होते. यामध्ये 2012 ला मोर्ने मॉर्केलने तर 2020 मध्ये कागिसो रबाडाने हा मान संघाला मिळवून दिला.
5 / 5
मुंबई इंडियन्स, किंग्स इलेवन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या संघातील खेळाडूंनी एक-एकदा हा मान मिळवला आहे. राजस्थानच्या सोहेल तनवीरने 2008 मध्ये, मुंबई इंडियन्सच्या लसिथ मलिंगाने 2011 मध्ये आणि किंग्स इलेवन पंजाबच्या अँड्रयू टायने 2018 मध्ये हा खिताब पटकावला होता.