मुंबई: IPL 2022 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्समध्ये (CSK vs GT) सामना सुरु आहे. वानखेडे स्टेडियमवर 62 वा सामना खेळला जात आहे. ऋतुराज गायकवाडच्या (53) अर्धशतकाच्या बळावर चेन्नईने गुजरातला विजयासाठी 134 धावांचे टार्गेट दिलं आहे. आज चेन्नईचा संघ मैदानावर खेळत असताना त्यांच्यामध्ये धावांची भूक दिसली नाही. टी-20 क्रिकेटला साजेसा खेळ त्यांनी केला नाही. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि जगदीशनने चांगली फलंदाजी केली. पण त्यांच्या फलंदाजीतही ती आक्रमकता नव्हती. ऋतुराजने 49 चेंडूत 53 धावा केल्या. यात चार चौकार आणि एक षटकार होता. ड्वेन कॉनवेचा पहिला विकेट लवकर गेला. मोहम्मद शमीनमे त्याला 5 धावांवर सहाकरवी झेलबाद केलं. त्यानंतर मोइन अली आणि ऋतुराज गायकवाडने डाव सावरला. पण वेगाने धावा जमवल्या नाहीत.
CSK मध्ये एकटा पुण्याचा ऋतुराज भारी खेळला, इथे क्लिक करुन पहा त्याची हाफ सेंच्युरी
मोइन अली (21), एमएस धोनी अवघ्या (7) रन्सववर आऊट झाला. गुजरातच्या गोलंदाजांनी आज अचूक टप्पा आणि दिशा राखली. त्यांनी CSK च्या फलंदाजांना मोकळेपणाने फलंदाजी करुन दिली नाही. चेन्नईने निर्धारित 20 षटकात पाच बाद 133 धावा केल्या. CSK च्या डावात शेवटच्या पाच षटकात 24 धावा निघाल्या. पण एकही चौकार मारला नाही.
प्लेऑफच्या दृष्टीने तसं या सामन्याचं महत्त्व नाहीय. कारण चेन्नईची टीम आधीच प्लेऑफच्या बाहेर गेली आहे. गुजरात टायटन्सच्या टीमने प्लेऑफमध्ये आधीच प्रवेश केला आहे. पण टॉप 2 मध्ये रहाण्यासाठी गुजरात टायटन्स हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. प्लेऑफमध्ये पहिल्या दोन संघांना एलिमिनेटरचा सामना करावा लागणार नाहीय. प्लेऑफमधील पहिल्या दोन टीम्सना पुन्हा संधी आहे. जिंकल्यास थेट फायनल आणि हरल्यास पुन्हा एक संधी आहे. त्यामुळे आपलं पहिलं स्थान टिकवण्यासाठी गुजरात टायटन्स आजचा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल.