चेन्नई : गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये मंगळवारी IPL 2023 चा पहिला क्वालिफायर सामना खेळला गेला. चेन्नईने गुजरात टायटन्सचा 15 धावांनी पराभव केला व CSK आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा डाव 157 धावांवर आटोपला. रवींद्र जाडेजाने 4 ओव्हरमध्ये 18 धावा देऊन 2 विकेट घेतले.
आज विजेता संघ, थेट फायनलमध्ये पोहोचेल. पराभूत संघाला क्वालिफायर 2 ची मॅच खेळावी लागेल. गुजरात टायटन्सला अजून एक संधी आहे. मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील विजेत्याशी गुजरातला खेळाव लागणार आहे.
चेन्नईने गुजरात टायटन्सचा 15 धावांनी पराभव केला व CSK आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा डाव 157 धावांवर आटोपला. रवींद्र जाडेजाने 4 ओव्हरमध्ये 18 धावा देऊन 2 विकेट घेतले.
ऋतुराज गायकवाडने पाथिराणाच्या बॉलिंगवर विजय शंकरची जबरदस्त कॅच घेतली. त्याने 14 धावा केल्या. 17.3 ओव्हर्समध्ये गुजरातच्या 7 बाद 136 धावा झाल्या आहेत.
गुजरात टायटन्सची टीम बॅकफूटवर आहे. 15 ओव्हर अखेरीस त्यांच्या 6 बाद 102 धावा झाल्या आहेत. राहुल तेवतियाला 3 रन्सवर माहीश तीक्ष्णाने बोल्ड केलं.
गुजरात टायटन्सची टीम बॅकफूटवर आहे. 14 ओव्हर अखेरीस त्यांच्या 5 बाद 95 धावा झाल्या आहेत. डेविड मिलर (4), शुभमन गिल (42) हे भरवशाचे फलंदाज तंबूत परतले आहेत. रवींद्रा जाडेजाने 4 ओव्हरमध्ये 18 धावा देऊन 2 विकेट घेतले.
गुजरात टायटन्सला तिसरा झटका बसला आहे. दासुन शनाकाला रवींद्र जाडेजाने तीक्ष्णाकरवी कॅचआऊट केलं. त्याने 16 चेंडूत 17 धावा केल्या. 10.3 ओव्हर्समध्ये गुजरातच्या 3 बाद 72 धावा झाल्या आहेत.
चेन्नईला मोठं यश मिळालं आहे. कॅप्टन हार्दिक पांड्या 8 रन्सवर आऊट झाला. तीक्ष्णाने त्याला जाडेजाकरवी कॅचआऊट केलं. पावरप्लेच्या 6 ओव्हर्समध्ये गुजरात टायटन्सच्या 2 बाद 41 धावा झाल्या आहेत.
5 ओव्हर्समध्ये गुजरात टायटन्सच्या 1 बाद 39 धावा झाल्या आहेत. ओपनर शुभमन गिल 19 आणि कॅप्टन हार्दिक पंड्या 7 धावांवर खेळतोय.
3 ओव्हर्समध्ये गुजरात टायटन्सच्या 1 बाद 22 धावा झाल्या आहेत. वृद्धीमान साहा 12 रन्सवर आऊट झाला. दीपक चाहरने पाथिराणाकरवी कॅचआऊट केलं. ओपनर शुभमन गिल (9) धावांवर खेळतोय.
पहिली बॅटिंग करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 172 धावा केल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 44 चेंडूत 60 धावा केल्या. रवींद्र जाडेजा 22 रन्सवर आऊट झाला. मोईन अली 9 धावांवर नाबाद राहिला.
19 ओव्हर अखेरीस चेन्नईच्या 6 बाद 157 धावा झाल्या आहेत. CSK चा कॅप्टन एमएस धोनी 1 रन्सवर कॅचआऊट झाला. मोहित शर्माच्या गोलंदाजीवर हार्दिक पंड्याने कॅच घेतली.
18 ओव्हर अखेरीस चेन्नईच्या 5 बाद 148 धावा झाल्या आहेत. अंबाती रायुडूने सिक्स मारल्यानंतर राशिद खानने त्याला शनाकाकरवी 17 रन्सवर कॅचआऊट केलं.
16 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर मोहम्मद शमीने डेवॉन कॉनवेला राशिद खानकरवी कॅचआऊट केलं. कॉनवेने 34 चेंडूत 40 धावा केल्या. त्याने 4 चौकार लगावले. 16 ओव्हर अखेरीस चेन्नईची 4 बाद 131 स्थिती आहे. रवींद्र जाडेजा 4 आणि अंबाती रायुडूची 6 जोडी मैदानात आहे.
15 ओव्हरच्या अखेरीस चेन्नई सुपर किंग्सच्या 3 बाद 125 धावा झाल्या आहेत. या ओव्हरमध्ये दर्शन नलकांडेने अजिंक्य राहणेला शुभमन गिलकरवी कॅचआऊट केलं. अजिंक्य रहाणे सिक्स मारल्यानंतर बाद झाला. अजिंक्यने 10 चेंडूत 17 धावा केल्या.
12 व्या ओव्हरमध्ये चेन्नईला शिवम दुबेच्या रुपाने मोठा झटका बसला. 3 चेंडूत त्याने फक्त 1 रन्स केला. नूर अहमदने त्याला बोल्ड केलं. 13 ओव्हर अखेरीस चेन्नईच्या 2 बाद 99 धावा झाल्या आहेत. डेवॉन कॉनवे 31 रन्सवर खेळतोय. अजिंक्य रहाणे मैदानात आलाय.
ऋतुराज गायकवाडच्या रुपाने चेन्नईला पहिला झटका बसला आहे. मोहित शर्माच्या गोलंदाजीवर डेविड मिलरने कॅच घेतली. त्याने 44 चेंडूत 60 धावा केल्या. यात 7 फोर, 1 सिक्स आहे.
10 ओव्हर अखेरीस चेन्नईच्या बिनबाद 85 धावा झाल्या आहेत. ऋतुराज गायकवाड 42 चेंडूत 59 आणि डेवॉन कॉनवे 19 चेंडूत 24 रन्सवर खेळतोय.
ओपनर ऋतुराज गायकवाडने 36 चेंडूत अर्धशतक झळकवल. 9 ओव्हर अखेरीस चेन्नईच्या बिनबाद 76 धावा झाल्या आहेत. ऋतुराज गायकवाड 37 चेंडूत 51 आणि डेवॉन कॉनवे 16 चेंडूत 18 रन्सवर खेळतोय.
पावरप्लेच्या 6 ओव्हर्समध्ये चेन्नईच्या बिनबाद 49 धावा झाल्या आहेत. ओपनर ऋतुराज गायकवाड 26 चेंडूत 33 आणि डेवॉन कॉनवे 11 चेंडूत 14 रन्सवर खेळतोय. दुसऱ्या ओव्हरमध्ये मिळालेल्या जीवनदानाचा गायकवाडने फायदा उचलला. त्याने 4 फोर आणि 1 सिक्स मारला. कॉनवेने 2 फोर मारल्या आहेत.
4 ओव्हर अखेरीस चेन्नई सुपर किंग्सच्या बिनबाद 31 धावा झाल्या आहेत. ओपनर ऋतुराज गायकवाड 19 आणि डेवॉन कॉनवे 10 रन्सवर खेळतोय.
दर्शन नलकांडेने दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर ऋतुराज गायकवाडला आऊट केलं होतं. शुभमन गिलने कॅच घेतली होती. पण तो नो बॉल ठरला. त्यानंतर ऋतुराजने सलग एक सिक्स आणि फोर मारला. 2 ओव्हर अखेरीस चेन्नईच्या बिनबाद 18 धावा झाल्या आहेत. ओपनर ऋतुराज गायकवाड 14 आणि डेवॉन कॉनवे 2 रन्सवर खेळतोय.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना सुरु झाला आहे. गुजरातची टीम बॉलिंग करतेय. मोहम्मद शमीने पहिली ओव्हर टाकली. चेन्नईच्या बिनबाद 4 धावा झाल्या आहेत. ओपनर ऋतुराज गायकवाड 2 आणि डेवॉन कॉनवे 1 रन्सवर खेळतोय.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन | एमएस धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश थेक्षाना.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), दासुन शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, दर्शन नलकांडे, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.
चेन्नई विरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सने टॉस जिंकला आहे. कॅप्टन हार्दिक पंड्या याने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. त्यामुळे चेन्नई आपल्या घरच्या मैदानात गुजरातसमोर किती धावांचं आव्हान ठेवणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
चेन्नईची यंदा (IPL 2023) आयपीएल इतिहासात प्लेऑफमध्ये पोहचण्याची 12 वी वेळ ठरलीय. त्यामुळे चेन्नईने गुजरातला पराभूत केलं, तर चेन्नईची ही आयपीएल इतिहासात फायनलमध्ये पोहचण्याची 10 वी वेळ ठरेल, जो की एक रेकॉर्ड ठरेल.
गुजरात विरुद्ध चेन्नई हे दोन्ही संघांनी आतापर्यंत एकूण 3 वेळा आमनासामना केला आहे. यामध्ये गुजरातने चेन्नईला लोळवलंय. गुजरातने चेन्नई विरुद्ध खेळलेल्या तिन्हीच्या तिन्ही सामन्यात चेन्नईला घाम फोडलाय.