मुंबई: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) स्पर्धेला अखेर सुरुवात झाली आहे. आयपीएलच्या मागच्या सीजनमधील दोन फायनलिस्ट संघ KKR आणि CSK आमने-सामने आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede stadium) पहिली मॅच होत आहे. नाणेफेकेची कौल झाला आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकली असून पहिलं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही चॅम्पियन संघांकडे नवीन कर्णधार आहेत. रवींद्र जाडेजा टीमची कॅप्टनशिप भूषवताना दिसणार आहे. दोन दिवसांपूर्वी धोनीने टीमची कॅप्टनशिप जाडेजाकडे सोपवली.कोलकाताच नेतृत्व श्रेयस अय्यरकडे आहे.
आजच्या मॅचमध्ये कोण डेब्यु करतय, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
श्रेयस अय्यरने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वानखेडेची विकेट फलंदाजीसाठी अनुकूल आहे. रात्रीच्यावेळी दवामुळे लक्ष्याचा पाठलाग करण जास्त सोपं ठरेल. अय्यरसोबतच केकेआरसाठी सिनियर फलंदाज अजिंक्य रहाणे आणि इंगंलडचा विकेटकीपर फलंदाज सॅम बिलिंग्स डेब्य करत आहे. जाडेजा पहिल्यांदाच नेतृत्व करत आहे. सीएसकेच्या टीममध्ये डेवन कॉनवे, वेगवान गोलंदाज एडम मिल्न, भारतीय ऑलराऊंडर शिवम दुबे आणि युवा पेसर तृषार देशपांड CSK साठी डेब्यु करत आहेत.
Our first Playing 11 of the season! ?#KKR debuts for Skipper Shreyas, Ajinkya & Sam ?@winzoofficial #KKRHaiTaiyaar #CSKvKKR #IPL2022 #GalaxyOfKnights #কেকেআর pic.twitter.com/uTUcd3WJM3
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 26, 2022
CKS ची अशी आहे प्लेइंग Playing 11
CSK- रवींद्र जडेजा (कर्णधार), ऋतुरात गायकवाड़, डेवन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, एमएस धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन ब्रावो, राजवर्धन हंगरगेकर, मिचेल सँटनर, एडम मिल्न
KKR ची अशी आहे Playing 11
KKR- श्रेयस अय्यर (कर्णधार), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, नीतीश राणा, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), आंद्रे रसेल, मोहम्मद नबी, सुनील नरेन, शिवम मावी, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती