MS Dhoni CSK vs KKR: कोण म्हणतं थालाचं पोट सुटलं, KKR च्या गोलंदाजांना ठोकून काढलं

| Updated on: Mar 26, 2022 | 9:53 PM

MS Dhoni CSK vs KKR: धोनीचं पोट सुटलंय, तो टच मध्ये नाहीय, आता तो पूर्वीचा धोनी राहिलेला नाहीय, धोनीला पहिल्यासारखं खेळणं आता जमेल का? असे अनेक प्रश्न महेंद्रसिंह धोनी (MS dhoni) मैदानावर येण्याआधी उपस्थित करण्यात येत होते.

MS Dhoni CSK vs KKR: कोण म्हणतं थालाचं पोट सुटलं, KKR च्या गोलंदाजांना ठोकून काढलं
Follow us on

मुंबई: धोनीचं पोट सुटलंय, तो टच मध्ये नाहीय, आता तो पूर्वीचा धोनी राहिलेला नाहीय, धोनीला पहिल्यासारखं खेळणं आता जमेल का? असे अनेक प्रश्न महेंद्रसिंह धोनी (MS dhoni) मैदानावर येण्याआधी उपस्थित करण्यात येत होते. पण धोनीने आज आपल्या बॅटनेच त्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली. काही दिवसांपूर्वी सूरतमध्ये चेन्नई सुपर किंग्सच (CSK) ट्रेनिंग आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी धोनीचे फोटो पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. धोनीचं पोट सुटल्याच या फोटोमध्ये दिसत होते. पण आज धोनी मैदानावर पूर्णपणे वेगळा वाटला. धोनीने सुरुवात खूप सावध केली. कारण चेन्नईचा डाव संकटात होता. अवघ्या 61 धावांमध्ये चेन्नईचा निम्मा संघ तंबूत परतला होता. त्यावेळी धोनीने खेळपट्टीवर येऊन कॅप्टन रवींद्र जाडेजासोबत (Ravindra jadeja) डाव सावरला. रवींद्र जाडेजापेक्षा धोनीची फलंदाजी दमदार वाटली.

धोनी समोर तरुण खेळाडू फिके

धोनीपेक्षा अनेक तरुण खेळाडू सीएसकेच्या संघात आहेत. पण धोनी समोर त्यांची चमक फिकी ठरली. धोनीने अवघ्या 38 चेंडून नाबाद 50 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने सात चौकार आणि एक षटकार लगावला. धोनीमुळेच चेन्नईला धावफलकावर निर्धारीत 20 षटकात 131 धावा पहाता आल्या. उलट कर्णधार रवींद्र जाडेजाच थोडा दबावाखाली वाटला. त्याने 28 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या. फक्त एक चौकार त्याने लगावला.

धोनी हैं तो मुमकीन हैं

कोलकाताने आज टिच्चूक गोलंदाजी केली. डिफेंडिंग चॅम्पियन चेन्नई (CSK) यंदाही विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करेल. धोनी असताना हे शक्य आहे. कारण आकडेच याबद्दल सर्वकाही सांगून जातात.

आयपीएलच्या इतिहासात अजूनपर्यंत धोनीपेक्षा उत्तम फिनिशर दुसरा कोणीही झालेला नाही. शेवटच्या पाच षटकात धावा बनवण्याची गरज असेल आणि धोनी क्रीझवर असेल, तर गोलंदाजांची धुलाई ठरलेली आहे. आजही त्याचीच प्रचिती आली.