आयपीएल 2021 चा 38 वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात खेळवला गेला. चेन्नई सुपर किंग्ज आणि केकेआर या दोन्ही संघांनी दुसऱ्या टप्प्यातील दोन्ही सामने जिंकले होते. त्यामुळे आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. सामन्यात नाणफेक जिंकत केकेआरने फलंदाजी निवडली. पण मागील काही सामने उत्तम कामगिरी करणारे सलामीवीर गिल आणि अय्यर आज खास कामगिरी करु शकले नाही. राहुल त्रिपाठी (45) आणि नितीश राणा (37) यांच्याशिवाय इतर फलंदाज अधिक धावा करु शकले नाहीत. पण अखेरच्या काही चेंडूत दिनेशने 11 चेंडूमध्ये केलेले 26 रनही केकेआरला महत्त्वाचे ठरले असून चेन्नईसमोर 172 धावांचे लक्ष्य होते. चेन्नईकडून सलामीवीर ऋतुराज (40) आणि डुप्लेसी (43) यांनी उत्तम सुरुवात करुन दिली. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज अयशस्वी झाल्यानंतर 19 व्या षटकात जाडेजाने दोन षटकार आणि चौकार ठोकत चेन्नईच्या पारड्यात सामना आणून ठेवला. पण अखेरची ओव्हर सुनील नारायणने अप्रतिम टाकत दोन विकेट्सही घेतल्या. ज्यानंतर शेवटच्या एका चेंडूवर चेन्नईला एक धाव गरजेची असताना दीपक चाहरने ती घेत संघाला विजय मिळवून दिला.
अखेरच्या चेंडूवर चेन्नईला एक धाव गरजेची असताना दीपक चाहरने ती घेत संघाला विजय मिळवून दिला आहे.
अखेरच्या षटकात विजयासाठी सीएसकेला 4 धावांची गरज असताना नारायणने सॅम करनला बाद केलं आहे.
धोनी आणि रैना दोघांना एकाच षटकात वरुण चक्रवर्तीने बाद करत सामना अगदी रंगतदार स्थितीत आणून ठेवला आहे.
अंबाती रायडूला बाद करण्यात केकेआरला य़श आलं आहे. सुनिल नारायणने त्याला त्रिफळाचित केलं आहे.
ऋतुराज गायकवाडनंतर सलामीवीर फाफ डुप्लेसीस देखील बाद झाला आहे. अवघ्या 7 धावांनी त्याचं अर्धशतक हुकलं आहे.
सलामीला येत तुफान फलंदाजी करणारा ऋतुराज 40 धावा करुन बाद झाला आहे. रस्सेलच्या चेंडूवर मॉर्गनने त्याचा झेल घेतला आहे.
यंदाचं संपूर्ण पर्व सीएसकेला धमाकेदार सुरुवात करुन देणारे सलामीवर फाफ आणि ऋतुराज यांनी आजही केकेआरविरुद्ध उत्तम फलंदाजीला सुरुवात केली आहे. 5 ओव्हरनंतर सीएसकेचा स्कोर एकही विकेट न जाता 42 इतका होता.
रस्सेल बाद होताच फलंदाजीला आलेल्या दिनेश कार्तिकने तडाखेबाज फलंदाजी केली. त्याने 11 चेंडूत 26 धावा ठोकल्या ज्यामुळे केकेआरने चेन्नईला 172 धावांचे लक्ष्य दिले आहे.
Innings Break!
A great start and finish for #KKR as they post a total of 171/6 on the board.#CSK chase coming up shortly.
Scorecard – https://t.co/l5Nq3WffBt #CSKvKKR #VIVOIPL pic.twitter.com/XU84yD122M
— IndianPremierLeague (@IPL) September 26, 2021
आंद्रे रस्सेल बाद झाल्यामुळे केकेआरला मोठा झटका बसला आहे. शार्दूल ठाकूरने त्याला बाद केलं आहे.
चार गडी बाद झाल्यानंतर सध्या केकेआरचा फलंदाज नितीश राणा आणि आंद्रे रस्सेल सावध खेळी करत डाव सावरत आहेत.
कोलकात्याने महत्त्वाची विकेट गमावली आहे. रवींद्र जाडेजाने राहुल त्रिपाठीला 45 धावांवर असताना त्रिफळाचित केलं. (कोलकाता 89/4)
कोलकात्याने तिसरी विकेट गमावली आहे. जोश हेजलवूडने कर्णधार ओईन मॉर्गनला 8 धावांवर असताना फॅफ डुप्लेसीकरवी झेलबाद केलं. (कोलकाता 70/3)
कोलकात्याने दुसरी विकेट गमावली आहे. शार्दुल ठाकूरने वेंकटेश अय्यरला 18 धावांवर असताना यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीकरवी झेलबाद केलं.
कोलकात्याने पहिल्याच षटकात पहिली विकेट गमावली आहे. अंबाती रायुडूने शुभमन गिलला (9) धावचित केलं. (कोलकाता 10/1)
कोलकात्याचा कर्णधार इऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
? Toss Update ?@Eoin16 wins the toss & @KKRiders elect to bat against @msdhoni‘s @ChennaiIPL! #VIVOIPL #CSKvKKR
Follow the match ? https://t.co/l5Nq3WwQt1 pic.twitter.com/MOmXl5lEm8
— IndianPremierLeague (@IPL) September 26, 2021