CSK vs MI IPL 2023 : Rohit sharma काल ओपनिंगला न येता तिसऱ्या नंबरवर बॅटिंगला का आला?

| Updated on: May 07, 2023 | 12:03 PM

CSK vs MI IPL 2023 : Rohit sharma चालू आयपीएल सीजनमध्ये आता ओपनिंगला येणारच नाही का? रोहित शर्माने सीएसके विरुद्धची मॅच संपल्यानंतर तिसऱ्या नंबरवर बॅटिंगसाठी का आला? त्या बद्दल स्पष्टीकरण दिलं.

CSK vs MI IPL 2023 : Rohit sharma काल ओपनिंगला न येता तिसऱ्या नंबरवर बॅटिंगला का आला?
Follow us on

चेन्नई : चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या कालच्या सामन्यात रोहित शर्माने सर्वांनाच धक्का दिला. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा ओपनिंगला येतो. पण काल सीएसके विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा तिसऱ्या नंबरवर बॅटिंगसाठी आला. मुंबई इंडियन्सकडून कॅमरुन ग्रीन आणि इशान किशन ओपनिंगला आले होते. रोहितच्या या धक्कातंत्राने सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं. रोहित शर्मा ओपनिंगला का आला नाही? हाच प्रश्न सर्वांना पडला होता.

मुंबई इंडियन्सने असं का केलं असाव? यावरुन विविध तर्क-वितर्क लढवले जात होते. मुंबई इंडियन्सच्या या प्रयोगाचा म्हणा, काही फायदा झाला नाही. कारण 20 ओव्हर्समध्ये मुंबई इंडियन्स फक्त 139 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्सने 14 चेंडू बाकी राखून आरामात हे लक्ष्य पार केलं.

तिसऱ्या नंबरवर बॅटिंगवर येण्याबाबत रोहित शर्मा काय म्हणाला?

सामना संपल्यानंतर रोहित शर्माने आपण तिसऱ्या नंबरवर बॅटिंगसाठी का उतरलो? त्या बद्दल स्पष्टीकरण दिलं. “आमच्यासाठी जे योग्य होतं, ते आम्ही केलं. तिलक वर्मा खेळत नव्हता. मधल्या ओव्हर्समध्ये भारतीय फलंदाजांनी बॅटिंग करावी अशी आमची रणनिती होती. कारण या ओव्हर्समध्ये स्पिनर्सचा सामना करायचा होता. आमच्यासाठी हे घडू शकलं नाही. त्या परिस्थितीतून बाहेर येणं कठीण होतं. धावफलकावर पुरेशा धावा करण्याइतपत आम्ही चांगली बॅटिंग केली नाही” असं रोहित शर्मा म्हणाला.

चालू सीजनमध्ये रोहित शर्माच्या कामगिरीत सातत्य नाहीय. त्याने 10 सामन्यात फक्त 184 धावा केल्या आहेत. चालू सीजनमध्ये तो दुसऱ्यांदा डकवर आऊट झाला.

नेहल वढेरा एकटा लढला

सीएसके विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पावरप्लेमध्ये 3 विकेट गमावले. त्यामुळे मुंबई इंडियन्सची टीम बॅकफुटवर गेली. काल नेहल वढेरा एकटा मुंबई इंडिय़न्सकडून लढला. त्याने 64 धावा केल्या. आयपीएलमधील त्याची ही पहिली हाफ सेंच्युरी आहे. सूर्यकुमार यादव आणि ट्रिस्टन स्टब्स सोबत त्याने महत्वाच्या भागीदाऱ्या केल्या.

या विजयासह चेन्नई सुपर किंग्सची टीम 13 पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सची टीम 10 पॉइंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे. गुजरात टायटन्सची टीम 14 पॉइंट्ससह आघाडीवर आहे.