चेन्नई : चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्समध्ये आज इंडियन प्रीमियर लीगमधील 41 वा सामना झाला. या थरारक सामन्यात पंजाब किंग्सने शेवटच्या चेंडूवर धोनीच्या चेन्नईवर विजय मिळवला. सीएसकेने पहिली बॅटिंग केली. डेवॉन कॉनवेच्या 92 धावांच्या खेळीच्या बळावर चेन्नईने 200 धावांचा डोंगर उभारला. शिखर धवनच्या पंजाब किंग्सने शेवटच्या चेंडूवर विजयी लक्ष्य गाठलं.
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सवर 4 विकेट राखून विजय मिळवला. चेन्नईने विजयासाठी दिलेलं 200 धावांच टार्गेट शेवटच्या चेंडूवर पार केलं.
मोक्याच्या क्षणी जितेश शर्माची विकेट गेली आहे. पंजाबला हा धक्का आहे. तृषार देशपांडेच्या बॉलिंगवर सीमारेषेवर एसके राशिदने कॅच घेतली. शर्माने 10 चेंडूत 21 धावा केल्या.
18 ओव्हर अखेरीस पंजाबच्या 4 बाद 179 धावा झाल्या आहेत. जितेश शर्मा आणि शाहरुख खानची जोडी मैदानात आहे. पंजाबला 12 चेंडूत 22 धावांची गरज.
मोक्याच्याक्षणी पंजाब किंग्सला झटका बसलाय. सेट झालेला सॅम करन 29 रन्सवर आऊट झाला. त्याने 20 चेंडूत 29 धावा करताना 1 फोर आणि 1 सिक्स मारला. माथीशा पाथीराणाने करणला बोल्ड केलं.
16 ओव्हर अखेरीस पंजाबच्या 4 बाद 153 धावा झाल्या आहेत. लिव्हिंगस्टोन 40 धावांवर आऊट झाला. सॅम करनची 19 आणि जितेश शर्मा दोघांची जोडी मैदानात आहे. 23 बॉलमध्ये पंजाबला 47 धावांची गरज.
15 ओव्हर अखेरीस पंजाबच्या 3 बाद 129 धावा झाल्या आहेत. लिव्हिंगस्टोन 22 आणि सॅम करनची 19 दोघांची जोडी मैदानात आहे. 30 बॉलमध्ये पंजाबला 72 धावांची गरज.
13 ओव्हर अखेरीस पंजाबच्या 3 बाद 112 धावा झाल्या आहेत. लिव्हिंगस्टोन 17 आणि सॅम करनची 10 जोडी मैदानात आहे.
प्रभसिमरन पाठोपाठ रवींद्र जाडेजाने अथर्व तायडेला बाद केलं. आपल्याच गोलंदाजीवर त्याने तायडेचा 13 धावांवर झेल घेतला. पंजाबची तिसरी विकेट गेली आहे. 11 ओव्हर अखेरीस पंजाबच्या 3 बाद 97 धावा झाल्या आहेत.
10 ओव्हर अखेरीस पंजाब किंग्सच्या 2 बाद 94 धावा झाल्या आहेत. लियाम लिव्हिंगस्टोन (9) आणि अथर्व तायडेची (13) जोडी मैदानात आहे.
रवींद्र जाडेजाने चेन्नईला पंजाब किंग्सची महत्वाची विकेट मिळवून दिलीय. दमदार बॅटिंग करणाऱ्या प्रभसिमरन सिंगला स्टम्पआऊट केलं. त्याने 24 चेंडूत 42 धावा केल्या. 9 ओव्हर अखेरीस पंजाबची 84/2 अशी स्थिती आहे.
8 ओव्हर अखेरीस पंजाबच्या 1 बाद 80 धावा झाल्या आहेत. प्रभसिमरन सिंग 23 चेंडूत 42 आणि अर्थव तायडे 9 धावांवर खेळतोय.
कॅप्टन शिखर धवनच्या रुपाने पंजाबची पहिली विकेट गेली आहे. धवन चांगली बॅटिंग करत होता. तृषार देशपांडेने त्याला पाथिरराणाकरवी झेलबाद केलं. धवनने 15 चेंडूत 28 धावा केल्या. यात 4 फोर आणि 1 सिक्स आहे. 5 ओव्हर अखेरीस पंजाबच्या 1 बाद 54 धावा झाल्या आहेत.
4 ओव्हरच्या अखेरीस पंजाबच्या बिनबाद 46 धावा झाल्या आहेत. कॅप्टन शिखर धवन (24) आणि प्रभसिमरन सिंगची (20) जोडी मैदानात आहे.
3 ओव्हरच्या अखेरीस पंजाबच्या बिनबाद 34 धावा झाल्या आहेत. कॅप्टन शिखर धवन (21) आणि प्रभसिमरन सिंगची (11) जोडी मैदानात आहे. आकाश सिंह टाकत असलेल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये शिखरने दोन सिक्स मारल्या.
चेन्नईच्या 201 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी कॅप्टन शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंगची जोडी मैदानात उतरली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये पंजाबच्या बिनबाद 11 धावा झाल्या आहेत.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सने 20 ओव्हर्समध्ये 4 बाद 200 धावा केल्या आहेत. चेन्नईचा ओपनर डेवॉन कॉनवेच्या बळावर ही विशाल धावसंख्या उभारली. त्याने 52 चेंडूत नाबाद 92 धावा केल्या. यात 16 फोर आणि 1 सिक्स आहे. दुसरा ओपनर ऋतुराज गायकवाडने 37 आणि शिवम दुबेने 28 धावा केल्या.
मोइन अलीच्या रुपाने चेन्नईला तिसरा धक्का बसला आहे. चाहरने त्याला बाद केलं. मोइन अलीने 6 बॉलमध्ये 10 धावा केल्या. यात 2 चौकार होते. 17 ओव्हर अखेरीस चेन्नईच्या 3 बाद 169 धावा झाल्या आहेत.
15 व्या ओव्हर अखेरीस चेन्नईच्या 2 बाद 146 धावा झाल्या आहेत. डेवॉन कॉनवे 40 चेंडूत नाबाद 70 आणि मोइन अली 3 चेंडूत 5 धावांवर खेळतोय.
15 व्या ओव्हरमध्ये दमदार फलंदाजी करणारा CSK चा शिवम दुबे आऊट झाला. अर्शदीपच्या गोलंदाजीवर त्याने शाहरुखकडे झेल दिला. 17 चेंडूत 28 धावा करताना त्याने 1 फोर आणि 2 सिक्स मारले.
13 ओव्हर अखेरीस चेन्नईच्या 1 बाद 121 धावा झाल्या आहेत. डेवॉन कॉनवे 57 आणि शिवम दुबे 22 धावांवर खेळतोय. 34 बॉलमध्ये 57 धावा करणाऱ्या कॉनवेने 10 फोर आणि 1 सिक्स मारली आहे.
10 ओव्हर्समध्ये चेन्नईच्या 1 बाद 90 धावा झाल्या आहेत. ऋतुराज गायकवाड 31 बॉलमध्ये 37 धावांवर आऊट झाला. त्याने 4 फोर, 1 सिक्स मारला. डेवॉन कॉनवे 27 चेंडूत 45 धावांवर खेळतोय. आता शिवम दुबे मैदानात आलाय.
पावरप्लेच्या 6 ओव्हर्समध्ये चेन्नईच्या बिनबाद 57 धावा झाल्या आहेत. ऋतुराज गायकवाड 21 बॉलमध्ये 30 आणि डेवॉन कॉनवे 15 चेंडूत 23 धावांवर खेळतोय. ऋतुराजने 4 फोर, 1 सिक्स आणि कॉनवेने 5 फोर मारल्या आहेत.
चेन्नई विरुद्ध पंजाब सामन्याला सुरुवात झाली आहे. चेन्नईचे ओपनर ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे ही जोडी मैदानात आहे. 3 ओव्हर अखेरीस चेन्नईच्या बिनबाद 29 धावा झाल्या आहेत. ऋतुराज 15, कॉनवे 12 धावांवर खेळतोय.
चेन्नई विरुद्ध पंजाब सामन्याला सुरुवात झाली आहे. चेन्नईचे ओपनर ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे ही जोडी मैदानात आहे. पहिल्या ओव्हर अखेरीस चेन्नईच्या बिनबाद 7 धावा झाल्या आहेत.
एमएस धोनीची CSK आणि शिखर धवनची पंजाब किंग्स आज आमने-सामने असतील. चेन्नईमध्ये आज हायवोल्टेज सामना रंगणार आहे. मागच्या 3 सामन्यात चेन्नई एकदाही पंजाब किंग्सला हरवू शकलेली नाही.
एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने टॉस जिंकला असून त्यांनी पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईमध्ये हा सामना होतोय.
IPL 2023 पॉइंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम चौथ्या तर पंजाबची टीम सहाव्या स्थानावर आहे.