लंडन : क्रिकेटच्या मैदानात अनेकदा लांबलचक सिक्स पहायला मिळतात. फलंदाजाने सिक्स मारल्यानंतर जास्तीत जास्त स्टेडियमच्या बाहेर रस्त्यावर जाऊन बॉल पडतो. पण इंग्लंडमध्ये Vitality Blast स्पर्धेत फलंदाजाने मारलेला सिक्स थेट घरात घुसला. डेविड पायने या फलंदाजाने मारलेला सिक्स थेट घरात घुसला. ग्लूस्टरशायर आणि केंटमध्ये सामना सुरु होता. ब्रिस्टल येथे Vitality Blast स्पर्धेचा सामना सुरु होता.
ब्रिस्टलच्या या मैदानात एकाबाजूला अपार्टमेंट आहेत. तिथे लोक बालकनीमध्ये बसून क्रिकेट सामन्यांचा आनंद घेतात. लोक बालकनीमध्ये बसून ग्लूस्टरशायर आणि केंटचा सामना पाहत होते.
कोणी कल्पना केली नव्हती
19 व्या ओव्हरमध्ये ग्लूस्टरशायरच्या 9 विकेटवर 127 धावा झाल्या होत्या. 20 व्या ओव्हरमध्ये स्ट्राइकवर डेविड पायने होता. ग्रांट स्टीवर्टच्या हातात चेंडू होता. पायनेने पहिल्या बॉलवर फोर मारुन स्टीवर्टच वेलकम केलं. पायनेने स्टीवर्टच दुसरा चेंडू फक्त सीमारेषेपारच पोहोचवला नाही, तर थेट बालकनीमध्ये मारला. चेंडू घराच्या बालकनीमध्ये जाईल याची कोणी कल्पना केली नव्हती. बालकनीमध्ये एकर महिला फॅन मॅच पाहत होती.
त्यावेळी काय घडलं?
इंग्लिश खेळाडूने मारलेल्या या सिक्समुळे महिला जखमी झाली असती. कारण चेंडू तिला थेट लागला असता. डेविड पायनेचा हा सिक्स थेट घरात घुसला. महिला त्यावेळी सोफ्यावर बसली होती. चेंडू तिला लागला असता. पण त्याआधीच महिलेच्या पार्टनरने कॅच घेतली. सुदैवाने ही महिला बचावली.
David Payne nails a six which is then CAUGHT by a spectator on the balcony ?#Blast23 pic.twitter.com/BHZsSJYPA0
— Vitality Blast (@VitalityBlast) June 18, 2023
Well, it is BBQ season ?
Confusion between the Kent Spitfires openers and David Payne capitalises ?#Blast23 pic.twitter.com/LEHQN74d2J
— Vitality Blast (@VitalityBlast) June 17, 2023
कोण जिंकलं?
पुढच्याच चेंडूवर पायने 16 रन्सवर आऊट झाला. ग्लूस्टरशायरने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 137 धावा केल्या. केंटने हा सामना जिंकला. त्याने 18 चेंडूआधी 3 विकेट गमावून विजयी लक्ष्य गाठलं.