मुंबई: LIVE मॅचमध्ये अनेकदा खेळाडूंना दुखापती होत असतात. खेळाडू जिंकण्यासाठी आपल्याबाजूने शक्य ते सर्व करण्याचा प्रयत्न करतात. याच प्रयत्नात काहीवेळा खेळाडूंबरोबर दुर्घटना घडतात. डेविड वॉर्नर (David Warner) बरोबर असंच घडलं. इंग्लंड विरुद्ध (AUS vs ENG) टी 20 सीरीजच्या दुसऱ्या मॅचमध्ये दुखापत झाली. डेविड वॉर्नरला फिल्डिंग करताना ही दुखापत झाली. वॉर्नर कॅच पकडण्याच्या प्रयत्नात खाली पडला. त्याचं डोकं जोरात जमिनीवर आपटलं.
चेंडू जज करता आला नाही
इंग्लंडच्या डावात 15 व्या ओव्हरमध्ये डेविड वॉर्नरला दुखापत झाली. मिचेल स्टार्क गोलंदाजी करत होता. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर मोइल अलीने कव्हर्समध्ये शॉट मारला. तिथे उभ्या असलेल्या वॉर्नरला हा चेंडू योग्य पद्धतीने जज करता आला नाही. तो थोडा पुढे गेला.
वॉर्नरला वेदना होत होत्या
त्याने कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. पण यात तो जमिनीवर मागे पडला. त्याचं डोकं जोरात जमिनीवर आपटलं. वॉर्नरला वेदना होत होत्या. त्याला चक्कर आली. या घटनेनंतर वॉर्नरला मैदानाबाहेर नेण्यात आलं. वॉर्नरची कनकशन टेस्ट करण्यात आली. वॉर्नर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने 11 चेंडूत फक्त 4 धावा केल्या.
इंग्लंडच्या 178 धावा
कॅनबरामध्ये हा सामना झाला. इंग्लंडने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावून 178 धावा केल्या. डेविड मलानने 49 चेंडूत 82 धावा ठोकल्या. आपल्या अर्धशतकी खेळी दरम्यान मलानने 4 सिक्स आणि 7 फोर मारले.
मोइन अलीने 27 चेंडूत 44 धावांचे योगदान दिले. त्याआधी कॅप्टन जोस बटलर 17 धावांवर आऊट झाला. एलेक्स हेल्सने 4 रन्स केल्या. स्टोक्स 7 आणि ब्रूक 1 रन्स करुन पॅव्हेलियनमध्ये परतला.
David Warner is off the ground and being checked out after landing heavily attempting this catch #AUSvENG pic.twitter.com/mDKDsJBhte
— cricket.com.au (@cricketcomau) October 12, 2022
ऑस्ट्रेलियाची खराब फिल्डिंग
ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या टी 20 सामन्यात तीन कॅच सोडल्या. पहिली कॅच ग्लेन मॅक्सवेलने सोडली. वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ दोघांनी दोन सोपे झेल सोडले. गोलंदाजीत स्टॉयनिसने 3 विकेट काढल्या. एडम झम्पाने 2, स्टार्क आणि कमिन्सने प्रत्येकी 1-1 विकेट काढला.