सिडनी: ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरची बायको कँडिसने खळबळजनक आरोप केला आहे. अलीकडेच एडिलेड ओव्हलच्या मैदानात वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी सामना झाला. त्यावेळी मला माझ्या मुलींसमोर वाईट गोष्टी ऐकाव्या लागल्या, असं आरोप कँडिसने केला आहे. कँडिस मागच्या शनिवारी मुलींसोबत कसोटी सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आली होती. त्यावेळी काही लोकांच्या गटाने आपल्याला टार्गेट केलं, असं कँडिसच म्हणणं आहे. कँडिसने Triple Ms Summer Breakfast या कार्यक्रमात हा खुलासा केला.
लोकांचा एक मोठा गट समोर होता
“एडिलेड ओव्हलमध्ये शनिवारी दुपारी, लंच ब्रेक आधी, माझ्या मुलींना वडिलांना पहायच होतं. म्हणून आम्ही एडिलेड ओव्हलच्या एका एरियामधून दुसऱ्या एरियात गेलो. हे अंतर 200 मीटरच होतं. त्यावेळी दोन मुली माझ्यासोबत होत्या. लोकांचा एक मोठा गट समोर होता. त्यावेळी पाच-सहा जणांनी मला माझ्या मुलींसमोर काही वाईट गोष्टी ऐकवल्या” असं कँडिसने सांगितलं.
ते माझ्यावर हसत होते
“ते लोक माझ्यावर हसत होते, म्हणून मी त्यांना उत्तर देण्याचा निर्णय घेतला” असं वॉर्नरच्या पत्नीने सांगितलं. मी चालत होते. पण मी थांबले आणि त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्यातल एक जण जास्त बोलत होता. ते माझ्यावर हसत होते. आपण जे करतोय, ते बरोबर आहे असं त्यांना वाटत होतं. म्हणून मी त्यांचा सामना करण्याचा निर्णय घेतला. खरंतर मला असं करायची गरज नव्हती, मुली माझ्यासोबत होत्या. पण मला माझ्या कृतीतून मुलींसमोर उद्हारण ठेवायचं होतं, म्हणून मी त्यांचा सामना केला” असं कँडिसने सांगितलं.
डेविड वॉर्नर ‘या’ सीरीजमध्ये खेळणार
17 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सीरीज खेळली जाणार आहे. डेविड वॉर्नर या मालिकेत खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2018 साली केपटाऊनमध्ये कसोटी सामना खेळला गेला. त्यावेळी डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमरुन बेनक्राफ्ट यांना चेंडूशी छेडछाड करताना पकडण्यात आलं होतं. त्यासाठी स्मिथ-वॉर्नर यांच्यावर प्रत्येकी एक वर्षाची बंदी घालण्यात आली. बेनक्राफ्टवर नऊ महिन्यांची बंदी होती. स्मिथच्या कॅप्टनशिपवर दोन वर्षांसाठी तर वॉर्नरच्या कॅप्टनशिपवर आजीवन बंदी घालण्यात आली.