मुंबई: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नर (David warner) बिग बॅश लीग (big bash league) मध्ये खेळताना दिसणार आहे. बीबीएलच्या पुढच्या सीजन मध्ये तो सिडनी थंडर (sydney thunder) संघाकडून खेळताना दिसणार आहे. वॉर्नर 2013 नंतर पहिल्यांदा आपल्या देशाच्या या टी 20 लीग मध्ये सहभागी होणार आहे. वॉर्नरने स्वत: सिडनी थंडर सोबतच्या कराराची पृष्टी केली. सिडनी थंडरनेही आपल्या टि्वटर हँडलवर टि्वट करुन ही माहिती दिलीय. वॉर्नर आतापर्यंत तीन बीबीएलचे सामने खेळला आहे. यात दोन सामने सिडनी थंडर संघासाठी खेळला होता. या फ्रेंचायजीसाठी त्याने शतक झळकावलं आहे. आगामी सीजनमध्ये सिडनी थंडरकडून तो पाच सामने खेळणार आहे. जानेवारीच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यानंतर तो उपलब्ध असेल. थंडरचा संघ फायनल मध्ये पोहोचल्यानंतरही तो उपलब्ध असेल.
वॉर्नर सर्वप्रथम 2011 मध्ये बीबीएलचा भाग होता. 2013 पर्यंत तो या लीग मध्ये खेळला. सिडनी थंडरकडून खेळताना मेलबर्न स्टार्स विरुद्ध शतक बनवलं. त्यानंतर तो सिडनी सिक्सर्ससाठी खेळला. थंडरसाठी खात न उघडताच आऊट झाला होता. 2013 साली तो पुन्हा थंडर्सच्या संघात सहभागी झाला. सिक्सर्स विरुद्ध अर्धशतक फटकावलं होतं.
काही दिवसांपूर्वी ‘द ऑस्ट्रेलियन’ वर्तमानपत्रात वृत्त प्रसिद्ध झालं होतं की, यूएईमधील नव्या टी 20 लीग मध्ये खेळण्यासाठी वॉर्नर ऑस्ट्रेलियाकडे NOC मागणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका झाल्यानंतर त्याला बीबीएल मध्ये नाही, तर यूएई लीग मध्ये खेळायचं होतं.