इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या हंगामातील 50 वा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला गेला. चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील या सामन्यात दिल्लीने चेन्नईवर 3 विकेट्सनी विजय मिळवत गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं.
सामन्यात नाणेफेक जिंकत दिल्ली कॅपिटल्स संघाने गोलंदाजी निवडली आहे. त्यानंतर फलंदाजी करताना चेन्नईचे जवळपास सर्वच फलंदाज अपयशी ठरले. केवळ अंबाती रायडूने नाबाद 55 धावा झळकावल्या. त्याला धोनीने 18 धावांची मदत केली. ज्यामुळे चेन्नईने 136 धावा करत दिल्लीसमोर 137 धावांचे आव्हान ठेवले होते. दिल्लीची फलंदाजीही चेन्नईप्रमाणे ढासळली. पण शिखरने सुरुवातीला केलेल्या 39 धावा आणि शिमरॉन हीटमायरच्या महत्त्वाच्या वेळी केलेल्या नाबाद 28 धावांच्या जोरावर दिल्लीने अखेर 3 विकेट्सनी सामना जिंकला.
शेवटच्या 3 चेंडूत 2 धावांची गरज असताना फलंदाजीला आलेल्या रबाडाने चौकार लगावत सामना दिल्लीला 3 विकेट्सनी जिंकून दिला आहे.
4 चेंडूत 2 धावांची गरज असताना ब्रावोने अक्षरला बाद केलं आहे. आता दिल्लीला विजयासाठी 3 चेंडूत 2 धावांची गरज आहे.
शिमरॉन हीटमायरने दिल्लीला सामन्यात पुन्हा आणले आहे. अखेरच्या षटकात दिल्लीला विजयासाठी केवळ 6 धावांची गरज आहे.
दिल्ली संघाची खिंड एकहाती लढवणारा शिखर धवनही बाद झाला आहे. शार्दूलनेच त्याची विकेट घेतली असून मोईन अलीने झेल घेतला आहे.
चेन्नईचा पाचवा विकेटही लगेच पडला असून आर आश्विन केवळ 2 धावा करुन तंबूत परतला आहे. शार्दूल ठाकूरने त्याला त्रिफळाचीत केलं आहे.
यंदाच्या हंगामात सलामीचा सामना खेळणारा रिपल पटेल जाडेजाच्या चेंडूवर चाहरच्या हाती झेलबाद झाला आहे.
बर्थडे बॉय ऋषभ पंतही बाद झाला आहे. 15 धावा केल्यानंतर जाडेजाच्या चेंडूवर मोईन अलीने त्याची विकेट घेतली आहे.
दिल्लीचा माजी कर्णधार श्रेयस अय्यरने मागील सामना संघाला जिंकवून दिला होता. पण आज मात्र तो स्वस्तात माघारी परतला आहे. हेझलवुडने त्याची विकेट घेतली आहे.
फलंदाजीला येताच धमाकेदार खेळीला सुरुवात करणारा पृथ्वी शॉ बाद झाला आहे. दीपक चाहरच्या चेंडूवर फाफने त्याला झेल घेतला आहे.
137 धावा करण्यासाठी चेन्नईचे फलंदाज मैदानात उतरले आहेत. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन सध्या मैदानात आहेत.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईचे जवळपास सर्वच फलंदाज अपयशी ठरले. केवळ अंबाती रायडूने नाबाद 55 धावा झळकावल्या. त्याला धोनीने 18 धावांची मदत केली. ज्यामुळे चेन्नईने 136 धावा करत दिल्लीसमोर 137 धावांचे आव्हान ठेवले आहे.
संघाचा डाव एकहाती सांभाळत अनुभवी रायडून अर्धशतक झळकावलं आहे.
चेन्नईचा डाव सांभाळणारा कर्णधार धोनी 18 धावा करुन बाद झाला आहे. आवेश खानच्या चेंडूवर पंतने त्याचा झेल घेतला आहे.
पहिले चार गडी पटापट बाद झाल्यानंतर कर्णधार धोनीने रायडूसोबत मिळून संघाचा डाव सावरला आहे. चेन्नई संघाच्या 100 धावा नुकत्याच पूर्ण झाल्या आहेत.
अक्षर पटेलने मोईन अलीला बाद करताच आजच्या सामन्यात संघात पुनरागमन करणाऱ्या रॉबिनची विकेट दिल्लीचा अनुभवी गोलंदाज आश्विनने घेतली आहे.
फाफ नंतर चौथ्या षटकात 13 धावा करुन ऋतुराजही बाद झाला आहे. नॉर्खियाच्या चेंडूवर आश्विनने त्याचा झेल घेतला आहे.
चेन्नईचा सलीमीवीर फाफची विकेट गेली आहे. अक्षर पटेलच्या चेंडूवर श्रेयस अय्यरने त्याचा झेल घेतला आहे.
यंदाच्या पर्वात कमालीच्या फॉर्ममध्ये असणारे चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसी फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत.
दिल्ली कॅपिटल्स संघात स्टीव्ह स्मिथच्या जागी रीपल पटेल याला संधी देण्यात आली आहे. तर चेन्नई संघात सुरेश रैना जागी रॉबीन उथप्पा खेळणार आहे.
एमएस धोनी (कर्णधार-विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड़, फाफ डुप्लेसी, मोईन अली, रॉबिन उथप्पा, रैना, अंबाती रायडू, रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, जॉश हेजलवुड
पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), मार्कस स्टयनिस, शिमरॉन हिटमायर, रिपल पटेल, अक्षर पटेल, आर आश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान
नाणेफेक जिंकत दिल्ली कॅपिटल्स संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. त्यामुळे चेन्नई संघाचे खेळाडू प्रथम फलंदाजी करतील.