मुंबई : आयपीएल-2021 (IPL 2021) स्पर्धेतील दोन फायनलिस्ट आपल्याला मिळाले आहेत. पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. तर चेन्नईविरोधात पराभूत झालेली दिल्ली दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पोहोचली. जिथे त्यांचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी झाला. इथेही त्यांचा पराभव झाला आणि पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्सने अंतिम फेरीत स्थान मिळवले. आता शुक्रवारी चेन्नई आणि कोलकाता हे दोन्ही संघ अंतिम फेरीत आमनेसामने येतील. कोलकात्याने दिल्लीला एका रोमहर्षक सामन्यात हरवले, पण या सामन्यानंतर या संघाला एक वाईट बातमी मिळाली आहे. संघाचा अनुभवी खेळाडू आणि माजी कर्णधार दिनेश कार्तिकला शिक्षा झाली आहे. कार्तिकला सामन्यानंतर त्याच्या वागण्याबद्दल आयपीएलने फटकारले आहे. (DC vs KKR : Dinesh Karthik reprimanded for breaching IPL Code of Conduct)
आयपीएलने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, दिनेश कार्तिक लीगच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. आयपीएलने एका निवेदनात म्हटले आहे की, “कोलकाता नाईट रायडर्सचा यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक इंडियन प्रीमियर लीगच्या क्वालिफायर 2 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळलेल्या सामन्यात लीगच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे.” कार्तिकने लेव्हल 1 च्या कलम 2.2 चे उल्लंघन केले आहे. त्याने आपली चूक मान्य केली आहे आणि शिक्षा स्वीकारली आहे. लेव्हल -1 च्या नियमांचे उल्लंघन केल्यास संघाच्या मॅच रेफरीचा निर्णय अंतिम असतो.
केकेआर आणि दिल्लीमधील काल झालेला सामना म्हणजे आयपीएलच्या इतिहासातील काही चुरशीच्या सामन्यांपैक एक ठरला. दिल्लीच्या 136 या सोप्या लक्षाचा पाठलाग केकेआरने उत्तम सुरु केला. एका क्षणी केकआरला 24 चेंडूत केवळ 13 धावांची गरज होती. सोबत त्यांच्या हातात 8 विकेट्सही होत्या. पण त्याच क्षणी दिल्लीच्या गोलंदाजानी जादूई गोलंदाजी करत केकेआरचे एक-एक फलंदाज तंबूत धाडले. एकाक्षणी 2 चेंडूत 6 धावांची गरज केकेआरला असतानाच राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.
सामन्यात नाणेफेक जिंकत केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनने गोलंदाजी निवडली. त्यामुळे दिल्लीच्या खेळाडूंनी प्रथम फलंदाजी केली. पण संघातील सर्वच खेळाडू केकेआरच्या गोलंदाजीच्या माऱ्यासमोर गारद झाले. ज्यामुळे ते केवळ 135 धावाच करु शकले आहेत. यामध्येही शिखरने सर्वाधिक 38 तर अय्यरने नाबाद 30 धावा केल्या. य़ाशिवाय शॉ आणि स्टॉयनीसने प्रत्येकी 18 तर हीटमायरने 17 धावा केल्या. केकेआरकडून मिस्ट्री स्पीनर चक्रवर्तीने 2 तर मावी आणि फर्ग्यूसनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
अवघ्या 136 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या केकेआरच्या सलामीवीरांनी अप्रतिम फलंदाजी करत संघाचा विजय जणू पक्का केला होता. व्यंकटेश अय्यर आणि शुभमन गिल यांनी मिळून मोठी भागिदारी केली. 96 धावांवर संघ असताना अय्यर 55 धावा करुन बाद झाला. त्याने 41 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार ठोकले. तर शुभमन 46 धावा करुन बाद झाला. त्याने 46 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकार ठोकला. त्यासोबत नितीशने 13 धावा केल्या. पण या दोघांच्या बाद होताच संघाला जणू उतरती कळाच लागली. एक एक करत फलंदाज बाद होत गेले. अगदी शेवटच्या षटकात लागोपाठ दोन विकेट जाताच 2 चेंडूत 6 धावांची गरज संघाला होती. त्याचवेळी राहुल त्रिपाठीने दमदार असा षटकार ठोकत संघाला 3 विकेट्स आणि 1 चेंडू राखून विजय मिळवून दिला.
इतर बातम्या
IPL 2021: सनरायजर्स हैद्राबाद वाईट वर्तवणूकीनंतरही डेव्हिड वॉर्नरला संघासोबत खेळायचंय, म्हणाला…
‘विराट कोहली एक अपयशी कर्णधार’, आरसीबीच्या पराभवानंतर मायकल वॉन पुन्हा बरळला
RCB Captiancy: ‘विराट कर्णधार म्हणून अपयशीच’, 3 देशांच्या 4 दिग्गज क्रिकेटपटूंचे टीकास्त्र
(DC vs KKR : Dinesh Karthik reprimanded for breaching IPL Code of Conduct)