मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या सीजनमध्ये कुलदीप यादव (Kuldeep yadav) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आयपीएल सुरु होण्याआधी कुलदीपची टीम इंडियात (Team india) निवड झाली होती. पण तिथे त्याला पुरेशी संधी मिळाली नाही. जणू त्याचा वचपाच कुलदीप या सीजनमध्ये काढतोय, असं कुलदीपची गोलंदाजी पाहून वाटतय. आज तर त्याने कोलकाता नाइट रायडर्सची (KKR) वाट लावून टाकली. तीन षटकात 14 रन्स देऊन चार महत्त्वाच्या विकेट त्याने काढल्या. आठव्या षटकात गोलंदाजी करताना त्याने पदार्पण करणाऱ्या बाबा इंद्रजीत आणि सुनील नरेन यांना पाठोपाठच्या चेंडूवर बाद केलं. त्यानंतर 14 व्या षटकात गोलंदाजी करताना केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यर आणि आंद्रे रसेलला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. श्रेयस अय्यरच्या विकेटमध्ये दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतचही मोलाचं योगदान आहे.
त्याने स्टम्पसपाठी एकाहाताने जबरदस्त झेल घेतला. आंद्रे रसेलला पंतने स्टम्पिंग केलं. सर्वाधिक विकेट काढण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पर्पल कॅपच्या शर्यतीत युजवेंद्र चहल पाठोपाठ कुलदीप दुसऱ्या स्थानावर आहे. चहलच्या खात्यात 18 तर कुलदीपच्या नावावर 17 विकेट आहेत.
KKR ची वाट लावणारा कुलदीप यादवचा भन्नाट स्पेल इथे क्लिक करुन एकदा पहाच
श्रेयसने पॅव्हेलियनची वाट धरली, ऋषभ पंतचा जबरदस्त झेल एकदा पहाच
दरम्यान ऋषभ पंतने आज टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला दिल्लीच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. अवघ्या 35 धावात त्याचे आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतले होते. पण श्रेयस अय्यरने पाचव्या विकेटसाठी नितीश राणासोबत 48 धावांची भागीदारी केली, तसंच नितीश राणाने संघ अडचणीत आज चांगला खेळ केला. त्याने 34 चेंडूत 57 धावा फटकावल्या. यात तीन फोर आणि चार सिक्स होते.
Splendid bowling. Time for some cautious, controlled batting ??
Let’s chase this one boys ?#YehHaiNayiDilli | #IPL2022 | #DCvKKR | #TATAIPL | #IPL | #DelhiCapitals pic.twitter.com/XnlVZmu8pz
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 28, 2022
रिंकू सिंहनेही 23 धावांची खेळी केली. त्यामुळे केकेआरने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये नऊ बाद 146 धावा केल्या. दिल्लीकडून मुस्तफीझूर रहमानने तीन विकेट घेतल्या.