आयपीएल 2021 मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एक महत्त्वाचा सामना खेळवला जात आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार इऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याच्या निकालाचा गुणतालिकेवर परिणाम होईल. दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करुन प्लेऑफच्या दिशेन पाऊल टाकण्याचा निर्धार मॉर्गनच्या संघाने केलेला असणार. केकेआरचा संघ गुणांच्या बाबतीत तीन संघांच्या बरोबरीचा आहे. त्यामुळे पंजाब, मुंबई आणि राजस्थानला मागे टाकण्यासाठी कोलकात्याला आजचा सामना जिंकणं आवश्यक आहे. दरम्यान सामन्यात नाणेफेक जिंकत केकेआरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय अगदी बरोबर ठरवत दिल्लीला अवघ्या 127 धावांमध्ये केकेआरने रोखले. ज्यानंतर 128 धावांचे आव्हान केकेआरने सहज पेलत विजय मिळवला. यावेळी शुभमनने (30) उत्तम सुरुवात केली. पण नितिश राणाने शेवटपर्यंत क्रिजवर टिकून नाबाद 36 धावा करत संघाचा विजय पक्का केला.
19 व्या षटकात विजयासाठी दोन धावांची गरज असताना नितीश राणाने चौकार लगावत संघाला तीन विकेट्सनी विजय मिळवून दिला आहे.
केकेआरला दोन धावांची गरज असताना टीम साऊदी बाद झाला आहे. आवेश खानने त्याला बोल्ड केलं आहे. आता केकेआरला 12 चेंडूत 2 धावांची गरज आहे.
विजयासाठी अवघ्या 6 धावंची गरज असताना केकेआरची सहावी विकेट पडली आहे. नारायणला नॉर्खियाने अक्षरच्या हाती झेलबाद केलं आहे.
केकेआरला 30 चेंडूत 30 धावांची गरज असताना सुनील नारायणने रबाडाच्या ओव्हरमध्ये धमाकेदार फलंदाजी करत 21 धावा ठोकल्या. आता केकेआरला 24 चेंंडूत 9 धावांची गरज आहे.
केकेआरचा माजी कर्णधार दिनेश कार्तिक नितीश राणासोबत संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना आवेश खानने त्याला बाद केलं आहे. आता केकेआरला 30 चेंडूत 30 धावांची गरज आहे.
केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने पुन्हा आज संघाच्या पदरी निराशा पाडली आहे. तो शून्यावर बाद झाला असून आश्विनच्या चेंडूवर ललितने त्याचा झेल पकडला आहे.
केकेआरचा डाव एकहाती पुढे नेणारा शुभमन गिल बाद झाला आहे. त्यामुळे राणा आणि गिल यांच्यातील भागिदारीही तुटली आहे. रबाडाने त्याची विकेट घेतली आहे.
मागील काही सामने उत्कृष्ट फलंदाजी केलेला राहुल त्रिपाठी आज मात्र 9 धावा करुन बाद झाला आहे. आवेश खानच्या चेंडूवर स्टीव स्मिथने त्याचा झेल घेतला आहे.
केकेआर संघाची पहिली विकेट पडली आहे. ललित यादवच्या चेंडूवर केकेआरचा सलीमीवीर व्यंकटेश अय्यर त्रिफळाचीत झाला आहे.
128 धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी केकेआरचे सलामीवर शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर मैदानात आले आहेत.
अखेरच्या षटकात पंत, आश्विन आणि आवेश खान यांची विकेट गेल्यानंतर दिल्ली केवळ 127 धावाच स्कोरबोर्डवर लावू शकली आहे. त्यामुळे केकेआरला विजयासाठी 128 धावांचे सोपे आव्हान आहे.
वेंकटेश अय्यरने दिल्लीला आणखी एक धक्का दिला आहे. त्याने अक्षर पटेलला लोकी फर्ग्युसनकरवी झेलबाद केलं. (दिल्ली 92/6)
89 धावांत दिल्लीचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. सुनील नारायणने ललित यादवला खातं उघडण्यापूर्वीच पायचित करुन माघारी धाडलं.
दिल्लीच्या संघाने चौथी विकेट गमावली आहे. वेंकटेश अय्यरने शिम्रन हेटमायरला 4 धावांवर असताना टीम साऊथीकरवी झेलबाद केलं. (दिल्ली 88/4)
स्टीव्ह स्मिथच्या रुपाने दिल्लीने आपली तिसरी विकेट गमावली आहे. लोकी फर्ग्युसनने त्याला त्रिफळाचित केलं. (दिल्ली 77/3)
शिखर धवन आणि श्रेयस अय्यरची विकेट लवकर गमावल्याने दिल्लीचा संघ थोडा दबावात आहे. त्यामुळे हा संघ सुरुवातीच्या 9 षटकांमध्ये केवळ 52 धावा जमवू शकला. स्टीव्ह स्मिथ (22) आणि कर्णधार रिषभ पंत (4) धावांवर खेळत आहेत.
दिल्लीने दुसरी विकेट गमावली आहे. सुनील नारायणने श्रेयस अय्यरला (1) त्रिफळाचित केलं. (दिल्ली 40/1)
दिल्लीने पहिली विकेट गमावली आहे. लोकी फर्ग्युसनने शिखर धवनला 24 धावांवर असताना वेंकटेश अय्यरकरवी झेलबाद केलं. (दिल्ली 35/1)
तिसऱ्या षटकात शिखर धवनने संदीप वॉरियच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला, दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर दोन खणखणीत चौकार वसूल करत धमाकेदार सुरुवात केली. (दिल्ली 22/0)
दिल्लीच्या डावाला सुरुवात झाली आहे. सलामीवीर मैदानात दाखल. दिल्लीने या सामन्यात पृथ्वी शॉ ऐवजी स्टीव्ह स्मिथला संधी दिली आहे.
कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार इऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
? Toss News from Sharjah ?@KKRiders have elected to bowl against @DelhiCapitals. #VIVOIPL #KKRvDC
Follow the match ? https://t.co/TVHaNszqnd pic.twitter.com/D9FdPl610T
— IndianPremierLeague (@IPL) September 28, 2021