अहमदाबाद : खेळाडूंना प्रोत्साहित करणं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं हे शिकावं तर एमएस धोनीकडून. धोनीच्या ही स्किल्स सर्वांनाच माहीत आहे. दीपक चाहर, ऋतुराज गायकवाड, शिवराम दुबे, तुषार देशपांडे, मतिशा पथिराना, महीश तीक्षणा ही मंडळी तर धोनीच्या तालमीतच मोठी झाली आहेत. धोनीच्या चाहत्यांनाही ही गोष्ट माहीत आहे. धोनी ज्या खेळाडूला तयार करतो, त्याला मग मैदानातही सुनावयला कमी करत नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. सर्वांच्या गळ्यातील ताईत असलेल्या दीपक चाहरला सुद्धा धोनीच्या या कडक शिकवणुकीचा चांगलाच अनुभव आलेला आहे.
इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार एकदा दीपक चाहर बीमर्समध्ये फसला होता. ओल्या चेंडूने तो यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी धोनी त्याच्या जवळ आला. अन् धोनीने सर्वांसमोरच चाहरला सुनावले. तू फार दीड शहाणा समजतोस का? तुला सर्व माहीत आहे. मग ओल्या चेंडूने गोलंदाजी का करत आहे, अशा शब्दात धोनीने चाहरचे कान उपटले. धोनीचे हे बोल ऐकल्यानंतर चाहर काय करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण चाहर मैदानात मान खाली घालून उभा होता. आपलं डेथ बॉलिंगचं करिअर आता संपलं असं त्याच्या मनात येऊन गेलं. कारण त्याने दोन वेळा बीमर फेकली होती. मात्र, पुढच्या सामन्यात त्याने 5 चेंडूत अवघ्या पाचच धावा दिल्या. त्यामुळे धोनी खूश झाला. धोनीने त्याला कडकडून मिठी मारली. त्यामुळे चाहरच्याही जीवात जीव आला.
तशी पाहिली तर चाहर आणि धोनीमध्ये चांगली बॉन्डिंग आहे. चेन्नई सुपर किंग्जमध्ये आल्यापासून चाहरच्या करिअरचा ग्राफ चांगलाच वाढला आहे. आपली निवड करणं किती योग्य होतं हे त्यानेही दाखवून दिलं. धोनीच्या कसोटीवर तो उतरला. चाहर हा धोनीच्या अत्यंत जवळचा आहे. आयपीएलच्या सीजनमध्ये या दोघांमधील बाँडिंगही दिसून आलं आहे. त्यांच्या चांगली मैत्री आहे. त्यामुळेच चाहरची टर उडवण्याची धोनी एकही संधी सोडत नाही. सरावाचं मैदान असो किंवा चाहर त्याच्या पत्नीसोबत असो, धोनी त्याची टिंगलटवळी करतोच.
? 57 seconds of ??#CHAMPION5 #WhistlePodu #Yellove ? pic.twitter.com/ZkyLFJeQPr
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 30, 2023
इतकेच काय आयपीएल कप जिंकल्यानंतरही धोनीने चाहरची प्रचंड खेचली. चेन्नई आयपीएलमध्ये पाचव्यांदा विजयी झाली. त्यामुळे चाहर आपल्या जर्सीवर धोनीचा ऑटोग्राफ घ्यायला गेला. पण धोनीने जर्सीवर सही करण्यास नकार दिला. एवढच कशाला धोनी लांबलांब पळत होता. पण चाहर त्याच्या पाठी पळाला. धोनीचा हात पकडला. पण धोनीच तो. त्याने तात्काळ झटका दिला. बराच वेळ हो हो ना ना केल्यानंतर धोनीने अखेर चाहरला ऑटोग्राफ दिलाच.