मुंबई : भारतीय क्रिकेटपटूंनी क्रिकेट इतिहासांत अनेक अशक्य विजय खेचून आणले आहेत. 1983 चा अशक्य वाटणारा विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी कधीच मागे वळून पाहिले नाही. सध्या जागतिक क्रिकेटमध्ये तिन्ही फॉर्मेटमधील एक तगडा संघ म्हणून भारताची ओळख आहे. आतापर्यंत अनेक अशक्य विजय विजय मिळवणाऱ्या भारताने मंगळवारी श्रीलंका संघाला (India vs Sri Lanka 2nd ODI) मात देत पुन्हा एकदा एका अप्रतिम विजयाची नोंद केली. या विजयात सिंहाचा वाटा ठरला तो दीपक चहरचा (Deepak Chahar). दीपकने सातव्या स्थानावर फलंदाजीला येत अडचणीत सापडलेल्या संघाला 82 चेंडूत 69 धावांची खेळी करत विजय मिळवून दिला. त्यानंतर सर्वच स्तरातून दीपकवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझाने (Pragyan Ojha) तर थेट दीपकला पाहून धोनीची आठवण आली असं इमोशनल ट्विट केलं आहे.
ओझाने ट्विटमध्ये थेट कोणाचच नाव न घेता दीपकचं कौतुक केलं आहे. ओझाने केलेल्या ट्विटमध्ये त्याने लिहीलंय ‘सातव्या नंबरच्या फलंदाजाने नंबर सात जर्सीची आठवण करुन दिली.’ दरम्यान चहर सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता आणि त्याने जगातील महान फिनिशर एम एस धोनी (M S Dhoni) प्रमाणे भूमिका निभावत सामना जिंकवून दिला. धोनीचा जर्सी क्रमांक सातच असल्याने ओझाने अशाप्रकारे ट्विट केलं आहे.
Number 7 reminds me of jersey no 7 during chase! Hope our lower order takes us home tonight. #SLvsIND pic.twitter.com/ItVjL7Zlvr
— Pragyan Ojha (@pragyanojha) July 20, 2021
श्रीलंकन फलंदाजांनी भारताला 276 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची आज खराब सुरुवात झाली. आक्रमक फलंदाज पृथ्वी शॉ (12) तिसऱ्याच षटकात बाद झाला. त्यापाठोपाठ इशान किशन (1), शिखर धवन (29), मनिष पांडे (37) हार्दिक पंड्या (0) एका मागोमाग एक ठराविक अंतराने बाद होत गेले. परंतु सूर्यकुमार यादवने एक बाजू लावून धरली होती. त्याने 42 चेंडूत 52 धावा फटकावत एकदिवसीय कारकीर्दीतलं पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं. त्यानंतर आलेल्या कृणाल पंड्याने 35 धावांचं योगदान दिलं. कृणाल बाद झाल्यानंतर सामन्याची सूत्र दीपक चाहरने हाती घेतली.
सुरुवातीला संयमी खेळी करत त्याने डावाला आकार दिला. त्यानंतर गरज पडेल तेव्हा फटकेबाजी करत 82 चेंडूत 69 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 1 षटकार फटकावला. भुवनेश्वर कुमारने (19) त्याला अखेरपर्यंत चांगली साथ दिली.
हे ही वाचा :
IND vs SL : 2021 मध्ये 2017 प्रमाणेच भारताचा रोमहर्षक विजय, तोच संघ, तोच खेळाडू, वाचा सुंदर योगायोग
दीपक चहरसाठी राहुल द्रविडचा ‘तो’ मेसेज आणि भारताने सामना जिंकला, वाचा नेमकं काय घडलं…?
(Deepak Chahar reminded us MS Dhoni says Former Cricketer Pragyan Ojha)