लखनऊ: श्रीलंके विरुद्धच्या टी 20 मालिकेआधी भारतीय संघाला झटका (Indian Cricket Team) बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka Cricket Team) टी 20 मालिकेत खेळू शकणार नाहीय. वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत खेळताना दीपक चाहरला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे षटक सुरु असतानाच दीपकला मैदान सोडावं लागलं होतं. दीपक चाहर सीरीजमध्ये खेळू शकणार नाही. फिटनेससाठी त्याला राष्ट्रीय क्रिकेट प्रबोधिनी NCA मध्ये जावं लागणार आहे. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे. मार्चच्या अखेरीस IPL स्पर्धा सुरु होणार आहे. तो पर्यंत दीपक चाहर फिट होतो का? ते पहावे लागेल. संघाने दीपकच्या जागी दुसऱ्या कुठल्याही पर्यायाची मागणी केलेली नाही. कारण जसप्रीत बुमराह पहिल्यापासून संघासोबत आहे.
दीपक चाहरच्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळण्याबद्दल थोडी साशंकता वाटत होती. दीपक चाहरला रविवारच्या सामन्यात चांगला सूर गवसला होता. त्याने सुरुवातीला दोन विकेटही काढल्या होत्या. पण दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकताना दीपक लंगडताना दिसला. लगडतच त्याने मैदान सोडलं.
‘टीयर’ ची दुखापत असेल, तर…
भारताने वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना 17 धावांनी जिंकला असला, तरी त्याची दुखापत चिंतेचा विषय आहे. दीपक चाहरला झालेली हॅमस्ट्रिंगची दुखापत किती गंभीर आहे, ते अजून स्पष्ट झालेलं नाही. ‘टीयर’ ची दुखापत असेल, तर दीपक चाहर आयपीएलच्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्सकडून खेळू शकतो का? हा प्रश्न आहे. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये दीपक चाहरला CSK ने 14 कोटी रुपये खर्च करुन विकत घेतलं आहे.
ग्रेड वनच्या टीयरमधून पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी, बरं होण्यासाठी सहा आठवड्याचा कालावधी लागतो. दोन दिवसांनी 24 फेब्रुवारीपासून श्रीलंकेविरुद्ध सुरु होणाऱ्या टी-20 मालिकेत दीपक चाहरच्या खेळण्याबद्दल साशंकता होती.
deepak chahar ruled out of 3 match t20i series against sri lanka due to injury