T 20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी एक प्लेयर टीममध्ये हवाच, सुनील गावस्करांनी सांगितलं त्याचं नाव

| Updated on: Sep 11, 2022 | 1:50 PM

आशिया कप 2022 स्पर्धेत टीम इंडियाचा प्रवास फायनलआधीच संपुष्टात आला. टीम इंडियाच लक्ष आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपवर लागलं आहे.

T 20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी एक प्लेयर टीममध्ये हवाच, सुनील गावस्करांनी सांगितलं त्याचं नाव
भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर
Image Credit source: social
Follow us on

मुंबई: आशिया कप 2022 स्पर्धेत टीम इंडियाचा प्रवास फायनलआधीच संपुष्टात आला. टीम इंडियाच लक्ष आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपवर लागलं आहे. 2007 साली पहिल्यांदा टी 20 वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी टीम इंडियाने बाजी मारली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा अजूनपर्यंत भारताला हा किताब जिंकता आलेला नाही. टीम इंडिया यंदा वर्ल्ड कप जिंकण्याच्या इराद्यानेच ऑस्ट्रेलियात जाणार आहे.

एका खेळाडूच नाव सुचवलं

वर्ल्ड कपआधी एक्सपर्ट्स, माजी क्रिकेटर प्रत्येक जण आपल्या हिशोबाने वर्ल्ड कपच्या टीमबद्दल अंदाज बांधत आहेत. टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी वर्ल्ड कपसाठी एका खेळाडूच नाव सुचवलं आहे. टीमला वर्ल्ड कप जिंकून देण्यामध्ये हा प्लेयर महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो.

हा खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावेल

“टी 20 वर्ल्ड कप 2022 साठी संघ निवड होणार आहेत. त्यात दीपक चाहरचा सुद्धा समावेश करावा” असं सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे. “तुम्ही ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कप खेळण्यासाठी जाणार आहात. तिथे एक्स्ट्रा बाऊन्स मिळतो. दीपक चाहर नवा चेंडू चांगला स्विंग करु शकतो. म्हणूनच दीपकची निवड टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण असेल” असं सुनील गावस्कर म्हणाले.

पुढच्या आठवड्यात निवडली जाणार टीम

येत्या 15 किंवा 16 सप्टेंबरला टी 20 वर्ल्ड कपसाठी संघ निवड होणार आहे. कॅप्टन रोहित शर्माने 80 ते 90 टक्के टीम तयार असल्याचे संकेत दिले होते. टीम इंडियात आता कुठल्या 15 खेळाडूंना स्थान मिळतं, त्याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

दोन महत्त्वाचे खेळाडू फिट

दरम्यान जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल फिट झाल्याची माहिती आहे. हे दोघेही टीमच्या वर्ल्ड कप रणनितीचा भाग आहेत. आशिया कप स्पर्धेआधी त्यांना दुखापत झाली होती. त्यांच्या वर्ल्ड कप संघातील समावेशाबद्दल प्रश्नचिन्ह होतं. त्यामुळे टीम मॅनेजमेंटची अडचण वाढली होती. पण आता दोघेही फिट आहेत. त्यामुळे सिलेक्टर्सना जास्त विचार मंथन कराव लागणार नाही.