मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेतला 32 वा सामना आज होणार की, नाही हा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे. कारण दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) आणखी एका खेळाडूला कोरोनाची बाधा झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक परदेशी खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive) आहे. बुधवारी दुपारी दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंची रॅपिड एंटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यात एक परदेशी खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर BCCI ने दिल्ली कॅपिटल्सच्या सर्व खेळाडूंना खोलीत स्वत:ला बंद करुन घेण्यास सांगितलं आहे.
बीसीसीआय या टीमच्या सर्व खेळाडूंची RT-PCR टेस्ट करणार आहे. प्रत्येक खेळाडूच्या खोलीमध्ये जाऊन नमुना गोळा करण्यात येईल. दिल्ली कॅपिटल्स त्याच खेळाडूंना संघात स्थान देऊ शकते, ज्यांचा आरटी-पीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असेल.
दिल्ली कॅपिटल्सच्या सहा सदस्यांना कोरोना झाला आहे. सर्व प्रथम पॅट्रिक फरहार्ट यांना कोरोना झाला. त्यानंतर सपोर्ट स्टाफमधील अन्य सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली. यात टीमचे मसाज स्पेशलिस्ट आणि डॉक्टरही आहेत. ऑलराऊंडर मिचेल मार्शलाही कोरोनामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्याने सामन्याचं ठिकाणही बदलण्यात आलं. आधी हा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियममध्ये होणार होता. पण आता हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये होईल.
An overseas player in the IPL team Delhi Capitals has been found positive in rapid testing. His RT-PCR awaited report is awaited.
— ANI (@ANI) April 20, 2022
आता सामन्याआधी दिल्लीच्या आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलय. सामना होईल, असे बीसीसीआयने संकेत दिले आहेत. जे खेळाडू तंदुरुस्त असतील, ते मैदानावर उतरतील.