IPL 2021 : वैयक्तिक आयुष्यात धक्के, पण बॅट मात्र तळपतीच, प्रत्येक हंगामात शिखरकडून रन्सचा पाऊस, प्रतिस्पर्ध्यांना धसका!
कोणत्याही खेळाडूला त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य असेल तेव्हा त्याला चांगला फलंदाज किंवा गोलंदाज म्हटले जाते. खूप कमी खेळाडू आहेत जे सलग अनेक वर्षे आपल्या बॅटमधून धावांची बरसात करत असतात आणि चांगली कामगिरी करत राहतात.
1 / 7
कोणत्याही खेळाडूला त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य असेल तेव्हा त्याला चांगला फलंदाज किंवा गोलंदाज म्हटले जाते. खूप कमी खेळाडू आहेत जे सलग अनेक वर्षे आपल्या बॅटमधून धावांची बरसात करत असतात आणि चांगली कामगिरी करत राहतात. आयपीएलमध्ये एक खेळाडू असाही आहे जो सतत त्याच्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित करतो. वाढत्या वयाबरोबर त्याच्या बॅटची धारही वाढत आहे. शिखर धवन असं या खेळाडूचं नाव... आयपीएलमध्ये धवन 2016 पासून सतत आपल्या बॅटची जादू दाखवत आहे आणि तो प्रत्येक हंगामात सातत्याने 400 धावांचा टप्पा पार करत आहे.
2 / 7
धवनने आयपीएल 2016 मध्ये एकूण 17 सामने खेळले आणि 38.53 च्या सरासरीने 501 धावा केल्या. या हंगामात धवन सनरायझर्स हैदराबादकडून खेळला आणि चार अर्धशतके ठोकली. सनरायझर्सने 2016 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले. या संघाने अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा पराभव केला.
3 / 7
आयपीएल 2017 मध्ये धवनने 14 सामने खेळले आणि 36.84 च्या सरासरीने 479 धावा केल्या. या हंगामात धवनच्या बॅटमधून तीन अर्धशतके निघाली. त्याची सर्वोच्च धावसंख्या 77 धावा होती.
4 / 7
2018 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडे डेव्हिड वॉर्नर नव्हता, पण संघ अंतिम फेरीत पोहोचला. इथे पुन्हा एकदा धवनने महत्त्वाची भूमिका बजावली. या हंगामात, धवनच्या बॅटमधून 16 सामन्यांमध्ये 497 धावा केल्या होत्या, त्याही चार अर्धशतकांच्या मदतीने. धवनने या हंगामात 38.23 च्या सरासरीने धावा केल्या.
5 / 7
धवनने 2019 साली संघ बदलला. धवनला दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतलं होतं. दिल्लीने बऱ्याच काळानंतर उत्कृष्ट खेळ दाखवत प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते. धवनने या मोसमात 16 सामन्यांत 521 धावा केल्या होत्या. त्याच्या बॅटमधून पाच अर्धशतके आली.
6 / 7
2020 मध्ये दिल्लीने प्रथमच आयपीएल फायनल खेळली. अर्थात, अंतिम फेरीत ती मुंबई इंडियन्सकडून हरली पण धवनची बॅट तिथेही तळपली. डावखुऱ्या शिखरने 17 सामन्यांमध्ये 44.14 च्या सरासरीने 618 धावा केल्या. या हंगामात धवनच्या बॅटमधून दोन शतके निघाली. याशिवाय त्याने चार अर्धशतके देखील केली.
7 / 7
आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. धवन यावेळीही ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे. या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या केवळ नऊ सामन्यांमध्ये धवनने 400 धावांचा टप्पा पार केला आहे. धवनने 422 धावा केल्या आहे, ते ही तीन अर्धशतकांसह... अजून हंगाम शिल्लक आहे आणि दिल्लीला अजून सहा सामने खेळायचे आहेत. धवन यावेळी ऑरेंज कॅप मिळविण्यात यशस्वी होतो की नाही, हे पाहावं लागेल.