IPL 2022 मध्ये आज सर्वात एकतर्फी सामना झाला. दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सला (DC vs PBKS) सहज हरवलं. दिल्लीच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. त्यांनी पंजाब किंग्सला 115 धावांवर रोखलं. त्यानंतर पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नरने जबरदस्त सुरुवात करुन दिली. त्यांच्या फलंदाजीच्या बळावर दिल्लीने नऊ विकेट राखून हा सामना जिंकला. वॉर्नर (David Warner) आणि शॉ ने वेगाने धावा जमवल्या. त्यामुळे 11 षटकातच दिल्लीने विजयी लक्ष्य गाठलं. दिल्लीने फक्त दोन पॉइंटच मिळवले नाहीत, तर त्यांच्या नेट रनरेटमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. सहा सामन्यात त्यांचा हा तिसरा विजय आहे. पंजाबचा सात सामन्यातील चौथा पराभव आहे. दिल्लीकडून डेविड वॉर्नरने नाबाद 60, पृथ्वी शॉ ने 41 आणि सर्फराझ खानने नाबाद 12 धावा केल्या.
अशी आहे पंजाब किंग्सची Playing – 11
मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, जॉनी बेयरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, शाहरुख खान, कागिसो रबाडा, नाथन एलिस, राहुल चाहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंह,
अशी आहे दिल्ली कॅपिटल्सची Playing – 11
ऋषभ पंत (कॅप्टन), पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, रोव्हमॅन पॉवेल, ललित यादव, सर्फराझ खान, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद
IPL 2022 मध्ये आज सर्वात एकतर्फी सामना झाला. दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सला सहज हरवलं. दिल्लीच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली.
? bowling effort ✅
? chase ✅Simply clinical stuff from the DC boys as we registered the biggest win in the history of the IPL in terms of balls to spare in a chase of 100+ runs ?#YehHaiNayiDilli | #IPL2022 | #DCvPBKS | #TATAIPL | #IPL | #DelhiCapitals pic.twitter.com/N8DVhgqdoM
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 20, 2022
दिल्ली कॅपिटल्सने जबरदस्त सुरुवात केली आहे. पाच षटकात बिनबाद 75 धावा झाल्या आहेत. डेविड वॉर्नर-पृथ्वी शॉ जोडीने पंजाब किंग्सची गोलंदाजी फोडून काढली. वॉर्नर 36 आणि पृथ्वी शॉ 35 धावांवर खेळतोय. आतापर्यंत 13 चौकार आणि एक षटकार ठोकला आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या भेदक गोलंदाजीसमोर पंजाब किंग्सचा डाव 115 धावात आटोपला. दिल्ली विजयासाठी 116 धावांचे टार्गेट आहे. या सीजनमधील ही सर्वात कमी धावसंख्या आहे.
पंजाब किंग्सची दिल्लीच्या गोलंदाजांनी वाट लावून टाकली. एका पाठोपाठ एक त्यांचे फलंदात तंबूत जात आहे. आता खलील अहमदने शाहरुख खानला ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं. त्याने 12 धावा केल्या. 14.3 षटकात पंजाबची स्थिती 92/8 आहे.
कागिसो रबाडाला कुलदीप यादवने तंबूत पाठवलं आहे. त्याने फक्त दोन धावा केल्या. कुलदीपने रबाडाला बोल्ड कलं. त्यानंतर षटकातील अखेरच्या चेंडूवर नाथन एलिसला शून्यावर बोल्ड केलं. 14 षटकात पंजाब किंग्सच्या 7 बाद 90 धावा झाल्या आहेत.
दिल्ली कॅपिटल्सला पाचवं यश मिळालं आहे. चांगली फलंदाजी करणाऱ्या जितेश शर्माला अक्षर पटेलने पायचीत पकडलं. 32 धावांच्या खेळीत जितेशने पाच चौकार लगावले. 12.1 षटकात पंजाबच्या पाच बाद 85 धावा झाल्या आहेत.
12 षटकात पंजाब किंग्सच्या चार बाद 85 धावा झाल्या आहेत.
10 षटकात पंजाब किंग्सच्या चार बाद 77 धावा झास्या आहेत. जितेश शर्मा 29 आणि शाहरुख खान 3 धावांवर खेळतोय.
पंजाब किंग्सच्या फलंदाजांचा तंबूत परतण्याचा सिलसिला कायम आहे. जॉनी बेयरस्टो आऊट झाला आहे. खलील अहमदच्या गोलंदाजीवर त्याने मुस्तफिजुर रहमानकडे झेल दिला. बेयरस्टोने 9 धावा केल्या. सात षटकात पंजाबच्या चार बाद 54 धावा झाल्या आहेत.
पंजाबला सर्वात मोठा धक्का बसला आहे. सातत्याने धावा करणारा फलंदाज OUT झाला आहे. लियाम लिव्हिंगस्टोन अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ऋषभ पंतने त्याचं स्टम्पिंग केलं. पावरप्लेच्या सहा षटकात पंजाबच्या तीन बाद 47 धावा झाल्या आहेत.
पाच ओव्हर्समध्ये पंजाब किंग्सच्या दोन बाद 44 धावा झाल्या आहेत. जॉनी बेयरस्टो आणि लियाम लिव्हिंगस्टोनची जोडी मैदानात आहे.
शिखर पाठोपाठ कॅप्टन मयंक अग्रवाल पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. 24 धावांवर खेळणाऱ्या मयंकला डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने बोल्ड केलं. मयंकने चार चौकार लगावले.
ललित यादवने चौथी ओव्हर टाकली. पंजाब किंग्सच्या एक बाद 33 धावा झाल्या आहेत. मयंक अग्रवाल 22 धावांवर खेळतोय. जॉन बेयरस्टो मैदानात आला आहे.
पंजाब किंग्सला पहिला झटका बसला आहे. सलामीवीर शिखर धवन 9 धावांवर बाद झाला. ललित यादवच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने स्टम्पसपाठी जबरदस्त झेल घेतला.
And the plan has worked!
Lalit strangles Gabbar down leg. How good was that #RP17 catch??!!#DCvPBKS https://t.co/gNegXULyKj
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 20, 2022
शार्दुल ठाकूरने तिसरी ओव्हर टाकली. या षटकात कॅप्टन मयंक अग्रवालने तीन चौकार मारले. पंजाबच्या बिनबाद 27 धावा झाल्या आहेत. मयंक 22 आणि शिखर 3 धावांवर खेळतोय.
दोन षटकात पंजाब किंग्सच्या बिनबाद 13 धावा झाल्या आहेत.
पंजाबच्या डावाला सुरुवात झाली आहे. शार्दुल ठाकूरने पहिली ओव्हर टाकली. पंजाब किंग्सच्या बिनबाद 7 धावा झाल्या आहेत. शिखर धवन-मयंक अग्रवाल ही सलामीची जोडी मैदानात आहे.
ऋषभ पंत (कॅप्टन), पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, रोव्हमॅन पॉवेल, ललित यादव, सर्फराझ खान, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद
मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, जॉनी बेयरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, शाहरुख खान, कागिसो रबाडा, नाथन एलिस, राहुल चाहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंह,