मुंबई : ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज ओपनर डेव्हिड वॉर्नरला नोव्हेंबर महिन्यातील बेस्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. त्याने टी-20 विश्वचषकात केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे त्याला हा सन्मान मिळाला आहे. त्याने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत 10 सिक्स आणि 32 चौकार ठोकत 289 धावा फटकावल्या आहेत. त्याने हा किताब मिळवत न्यूझीलंडचा गोलंदाज टीम सौदी आणि आबिद अलीला मागे टाकले आहे.
विश्वचषकातील धडाकेबाज खेळीचा फायदा
टी-20 विश्वषकावेळी ऑस्ट्रेलियन टीमचा बोलबाला आणि दबदब दिसून आला. फायनलमध्ये त्यांनी न्यूझीलंडला मात देत, विश्वषकाला गवसणी घातली. त्यांनी पाकिस्तानलाही सेमिफायनलमध्ये चांगलीच धूळ चारली. ऑस्ट्रेलिया टीमसाठी या स्पर्धेत सर्वात महत्वाचा खेळाडू ठरला तो म्हणजे डेव्हिड वॉर्नर. त्याला जगातील स्फोटक फलंदाजापैकी एक मानले जाते. वॉर्नरला मिळालेला सन्मान यासाठीही मोठा आहे, की तो विश्वचषकाआधी सर्वांच्या निशाण्यावर होता. आयपीएलमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या वॉर्नरला सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले होते. त्याला टीममध्ये जागा मिळणेही कठीण झाले होते. त्याआधी मात्र वॉर्नरची कामगिरी अत्यंत चांगली राहिली आहे. त्याने आयपीएलच्या सीझमध्ये सर्वात जास्त धावा ठोकत हैदराबादला विजेतेपदही जिंकून दिले आहे. मात्र यंदाचा त्याचा सीझन सुमार गेला होता.
कसोटी क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी
वॉर्नरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतही चांगली कामगिरी केली होती. याच सामन्यात तो जखमी झाल्याने दुसऱ्या कसोटी सामन्यालाही मुकला आहे. महिला क्रिकेटरमध्ये वेस्ट इंडिजची ऑलाऊंडर हेली मैथ्यूजची निवड बेस्ट क्रिकेटर म्हणून झाली आहे. तिने पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच तिला हा सन्मान मिळाला आहे.