मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) मध्ये सोमवारी (18 एप्रिल) संध्याकाळी कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये (RR vs KKR) एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात अनेक चढ-उतार पहायला मिळाले. संजू सॅमसनच्या राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर जॉस बटलरच्या शतकाच्या जोरावर पाच बाद 217 अशी विशाल धावसंख्या उभारली होती. त्यामुळे राजस्थान हा सामना सहज जिंकेल, असे अनेकांना वाटत होते. पण श्रेयस अय्यरच्या केकेआरने शानदार सुरुवात करुन हे अंदाज चुकीचे ठरवले. सामन्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा सर्वांना वाटत होते की कोलकाता या सामन्यात जिंकेल. मात्र फिरकीपटू युजवेंद्र चहलने एका षटकात कोलकात्याच्या तोंडचा घास हिरावला. 17 व्या षटकात त्याने 2 धावा देत हॅट्ट्रिकसह 4 बळी घेतले. यावेळी चहलने त्याच्या स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केलं. त्याचवेळी स्टेडियममध्ये उभी असलेली त्याची बायकोदेखील त्याला चिअर करत होती.
चहल आणि त्याची पत्नी धनश्रीचं सेलिब्रेशन पाहण्याआधी जाणून घ्या नेमकं सामन्यात काय घडलं. राजस्थान रॉयल्सकडून गोलंदाजी करताना चहलने कोलकाता नाईट रायडर्सला अक्षरश: लोळवलं. या सामन्यात त्याने पाच बळी घेत राजस्थानच्या विजयाची स्क्रिप्ट लिहिली. तसेच 17 व्या षटकात अत्यंत निर्णायक क्षणी हॅट्ट्रिक घेत त्याने शानदार गोलंदाजीचं प्रदर्शनही केलं. चहलनं हॅट्ट्रिक घेतल्यानंतर भर मैदानात त्याचीच मिम स्टाईल पुन्हा एकदा क्रिएट केली. यात तो रिलॅक्स होत, आराम करताना दिसतोय. त्याचवेळी त्याची पत्नी धनश्रीदेखील स्टेडियममध्ये जल्लोष करत होती, चहलला आणि त्याच्या संघाला चिअर करत होती. या दोघांच्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.
chahal hat-trick celebration ???❤️ #RRvKKR #chahal #IPL2022 #TATAIPL pic.twitter.com/W4r52hyshA
— ᎪᎷᏆͲ ᏦႮᎷᎪᎡ (@AmitKum50993580) April 18, 2022
राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा सामना अंतिम टप्यात आला असतानाच राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने चेंडू युजवेंद्र चहलच्या हाती सोपवला. त्याने 17 व्या षटकात कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यर, शिवम मावी आणि पॅट कमिन्सला तंबूत धाडलं. आयपीएलच्या इतिहासातली ही 21 वी आणि चहलची पहिली हॅट्ट्रिक आहे. विशेष म्हणजे चहलनं टिपलेले तीनही मोहरे हे केकेआरचे तगडे फलंदाज आहेत. पॅट कमिन्सला बाद करत त्याने हॅट्ट्रिक पूर्ण केली त्यावेळी चहलचं सेलिब्रेशन पाहण्यासारखं होतं. चहल खूश होत एकदम आराम करण्याच्या पोजिशनमध्ये मैदानात राजासारखा बसला. त्यावेळेस त्याच्या सहकाऱ्यांनीही याचा आनंद घेतला. दुसऱ्या बाजूला चहलची पत्नी स्टँड्समध्ये अक्षरशः उड्या मारत होती. नवऱ्याची हॅट्ट्रिक सेलिब्रेट करत होती.
Proud wife of an amazing husband!? Moment of the day! @DhanshreeVerma9 @yuzi_chahal Take a bow #yuzichahal for the first hatrick of #TATAIPL2022 ? & #Dhanshree mam u r expressions are as beautiful as u r. Congrats @rajasthanroyals pic.twitter.com/2wPfdHLikq
— Rahul Shinde (@RahulSh61138820) April 18, 2022
सामन्यापूर्वी कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून राजस्थानला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. त्यानंतर राजस्थानने पाच गड्यांच्या बदल्यात 217 धावांचा डोंगर उभा केला. जॉस बटलरने 61 चेंडूत 103 धावा ठोकल्या. त्यात 9 चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. त्यानंतर संजू सॅमसनने 38 आणि हेटमायरनं नाबाद 26 धावांचं योगदान दिलं. केकेआरकडून सुनील नरेननं दोन विकेट घेतल्या.
राजस्थान रॉयल्सने दिलेल्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची धमछाक झाली. त्यात एकट्या चहलने पाच विकेट घेत अर्धा संघ तंबूत धाडला. परिणामी 19.4 षटकात 210 धावांवर कोलकात्याचा डाव आटोपला. कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 85 धावा फटकावल्या. तर एरॉन फिंचनं 58 धावांचं योगदान दिलं. पण या दोघांनाही मॅचविनिंग खेळी करता आली नाही. दरम्यान पाच बळी घेणाऱ्या चहलने चार षटकात 40 धावा दिल्या.
चहलच्या पाच विकेट्सचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
इतर बातम्या
RR vs KKR IPL Match Result: अरेरे, KKR चा निसटता पराभव, चहलची गेम चेंजिंग ओव्हर