मुंबई: भारतीय संघाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) शनिवारी 23 जुलैला आपला 32 वा वाढदिवस साजरा केला. चहलला त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर (Soical Media) त्याच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडला. पण या सगळ्यामध्ये चहलसाठी एक शुभेच्छा संदेश खूपच खास होता. युजवेंद्र चहलला या शुभेच्छा त्याची पत्नी धनश्री वर्माने (Dhanshree varma) दिल्या. धनश्रीने नवऱ्यासाठी खास भावनिक संदेश लिहिला व सोबत एक फोटोही शेयर केला.
धनश्री नेहमीच चहल सोबत दिसते. प्रत्येकवेळी ती त्याच्या पाठिशी उभी असते. सामन्यादरम्यान अनेकदा ती स्टेडियम मध्ये चहलसाठी चियर करताना दिसते. आयपीएल असो वा, आंतरराष्ट्रीय सामना धनश्री संधी मिळेल, तेव्हा ती त्याचा उत्साह वाढवण्यासाठी स्टेडियम मध्ये पोहोचते. युजवेंद्र चहल सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहेत. तिथे तीन सामन्यांची वनडे सीरीज सुरु आहे.
धनश्रीने इन्स्टाग्रामवर पतीसाठी खास संदेश लिहिलाय. “आयुष्य एक प्रवास आहे. खऱ्याने अर्थाने ते सुंदर आहे. तुम्ही व्यक्ती म्हणून खूप चांगले आहात. देवाची कृपा नेहमीच तुमच्यावर राहूं दे. युजवेंद्र चहल वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी तुमची सर्वात मोठी फॅन आहे” असं धनश्री शुभेच्छा संदेशात लिहिलं आहे.
चहल आणि धनश्रीची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. कोविडमुळे लॉकडाउन होता. त्यावेळी चहलने डान्स शिकायचं ठरवलं. धनश्री नृत्य शिक्षिका आहे. चहलने डान्स शिकण्यासाठी धनश्रीशी संपर्क साधला. डान्स शिकताना आणि शिकवताना दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांची लव्ह स्टोरी सुरु झाली. त्यानंतर दोघांनी लग्न केलं.