धोनीची पत्नी आहे इतक्या कोटींची मालकीन, आकडा ऐकून झोपच उडेल

| Updated on: Dec 10, 2024 | 5:06 PM

महेंद्रसिंग धोनी याने आपल्या कामगिरीने भारतीय क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. आज त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्या विक्रमांमुळेच धोनीला मोठी प्रसिद्धी मिळाली. जाहिरातींच्या माध्यमातून त्याने भरपूर पैसे कमवले. पण तुम्हाला माहित आहे की, धोनीची पत्नी देखील करोडो रुपयांची मालकीन आहे. किती आहे साक्षी धोनीची संपत्ती जाणून घ्या.

धोनीची पत्नी आहे इतक्या कोटींची मालकीन, आकडा ऐकून झोपच उडेल
Follow us on

Sakshi Dhoni Networth : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम रचले. त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करुन दाखवली. म्हणून आजही धोनीच्या नेतृत्वाची जगभरात चर्चा होते. धोनी यंदाची आयपीएल देखील खेळणार आहे. त्याला क्रिकेटच्या मैदानावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सूक असतात. तो चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळणार आहे. यावेळी धोनीला आयपीएलसाठी अनकॅप्ड कॅटेगरीत ठेवण्यात आलंय. धोनी क्रिकेटमुळे प्रसिद्ध झाला आणि आता अनेक कंपन्या जाहिरातीसाठी त्याच्या मागे धावत असतात.

धोनीच्या अनेक ब्रँडसाठी जाहिराती

धोनीने अनेक ब्रँडसाठी जाहिराती केल्या आहेत. तो आज भारतातील श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. महेंद्रसिंग धोनीकडे 1000 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्याच्याकडे एक अलिशान घर, आलिशान कार आणि फार्म हाऊससह बरीच मालमत्ता आहे. पण तुम्हाला माहित आहे का, की धोनीशिवाय त्याची पत्नी साक्षी धोनीही कमी श्रीमंत नाही. ती देखील करोडो रुपयांची मालकीन आहे.

साक्षी धोनीकडे करोडोंची संपती

साक्षी धोनी देखील वेगवेगळ्या प्रकारे मोठी कमाई करते. साक्षी धोनीची श्रीमंत महिलांमध्ये गणना होते. साक्षी धोनीची एकूण संपत्ती 50 कोटी रुपयांपर्यंत असल्याचे अनेक रिपोर्टसमध्ये म्हटले आहे. साक्षी धोनीची एका रिअल इस्टेट फर्ममध्ये 25 टक्के हिस्सेदारी असल्याची माहिती आहे.

साक्षी धोनी महेंद्रसिंग धोनीच्या चित्रपट निर्मिती कंपनीची व्यवस्थापकीय संचालक देखील आहे. साक्षी नेहमीत आपल्या पतीसोबत खंबीरपणे उभी असते. मग ते आयपीएल असो किंवा अन्य कोणत्या गोष्टी. साक्षी आणि महेंद्रसिंग धोनी नेहमीच सगळीकडे एकत्र दिसतात. मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यातही दोघे एकत्र दिसले होते.

धोनीने 2010 मध्ये केले होते लग्न

धोनी आणि साक्षी यांनी 4 जुलै 2010 रोजी विवाह केला होता. पाच वर्षांनी दोघांना मुलगी झाली. जिचे नाव त्यांनी जीवा ठेवले. धोनीचा हा विवाह सोहळा खाजगी ठेवण्यात आला होता. या सोहळ्यासाठी मोजक्या लोकांनाच आमंत्रित करण्यात आले होते.