नवी दिल्ली: रणजी ट्रॉफी स्पर्धेत भारतीय फलंदाजांच दमदार प्रदर्शन कायम आहे. आसाम विरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा ओपनर ध्रुव शौरीने शानदार द्विशतक झळकावलं. पहिल्याडावात दिल्लीने 439 धावा केल्या. यात 252 धावांच योगदान एकट्या ध्रुव शौरीच आहे. ध्रुव शौरीने 315 चेंडूंचा सामना केला. त्याने एकट्याने 34 चौकार आणि 2 षटकार लगावले. दिल्लीच्या या फलंदाजाने आपल्या करिअरमधील पहिलं द्विशतक झळकावलं. 145 हे त्याचं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन होतं.
त्याच्या इनिंगच वैशिष्ट्य म्हणजे…
ध्रुव शौरीच्या इनिंगच वैशिष्ट्य म्हणजे तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये शेवटपर्यंत नाबाद राहून मोठा इनिंग खेळणारा तो तिसरा क्रिकेटर ठरला.
धोनीने किती मॅचमध्ये त्याला संधी दिली?
ध्रुव शौरीला धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने विकत घेतलं होतं. तेव्हा हा खेळाडू चर्चेत आलेला. ध्रुव शौरीला फक्त 2 मॅचमध्येच संधी मिळाली. 2018 च्या सीजनमध्ये एक आणि 2019 च्या सीजनमध्ये तो दुसरा सामना खेळला.
ध्रुवने दाखवलं शौर्य
2019 नंतर ध्रुव शौरीवर कुठल्याही आयपीएल टीमने बोली लावली नाही. 23 डिसेंबरला होणाऱ्या आयपीएल ऑक्शनआधी ध्रुवने आपलं शौर्य दाखवलय. येत्या 23 डिसेंबरला कोच्ची येथे आयपीएल 2023 साठी ऑक्शन रंगणार आहे. 10 फ्रेंचायजी देशी-विदेशी खेळाडूंवर बोली लावतील.