टीम इंडियाच्या फलंदाजांना अडचणीत आणणार गोलंदाज T20 World cup मधून बाहेर

| Updated on: Oct 16, 2022 | 3:14 PM

कोण आहे तो गोलंदाज? त्याच्याजागी टीममध्ये कोणाचा समावेश करणार?

टीम इंडियाच्या फलंदाजांना अडचणीत आणणार गोलंदाज T20 World cup मधून बाहेर
bowler
Image Credit source: AFP
Follow us on

मुंबई: आयसीसी टी 20 वर्ल्ड कपला (ICC T20 World Cup) आता कुठे सुरुवात झालीय. श्रीलंकेच्या (Srilanka) अडचणी वाढत चालल्या आहेत. त्यांचा डावखुरा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंका (Dilshan Madhushanka) टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर गेलाय. दुखापतीमुळे मुधशंका वर्ल्ड कपला मुकणार आहे. श्रीलंकेला त्याच्याजागी पर्याय मिळाला आहे. बिनुरा फर्नांडो याचा मधुशंकाच्या जागी टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

आयसीसीने फर्नांडोला टीममध्ये सहभागी करण्यास परवानगी दिली आहे. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप टुर्नामेंटमध्ये तांत्रिक समितीने दुखापतग्रस्त दिलशान मधुशंकाच्या जागी बिनुरा फर्नांडोचा श्रीलंकन टीममध्ये समावेश करण्यास परवानगी दिली आहे.

टेक्निकल समितीची परवानगी गरजेची

फर्नांडो लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा समावेश करण्यासाठी स्पर्धेच्या टेक्निकल समितीची परवानगी गरजेची आहे. आयसीसी वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय टीम निवडली जाते. त्याशिवाय रिझर्व्ह खेळाडू सुद्धा निवडले जातात. वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक टीमकडे चार रिझर्व्ह खेळाडू आहेत. मुख्य टीममधील एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास त्यांच्याजागी या खेळाडूंचा समावेश होतो.

भारताला आणलं होतं अडचणीत

आशिया कप स्पर्धेत याच मधुशंकाने टीम इंडियाला अडचणीत आणलं होतं. सहा सप्टेंबरला भारत वि श्रीलंका सामना झाला. या मॅचमध्ये चार ओव्हर्समध्ये 24 धावा देऊन तीन विकेट काढल्या होत्या. विराट कोहलीची विकेट त्याने काढली होती. त्याने कोहलीला बोल्ड केलं होतं. त्याशिवाय दीपक हुड्डाला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं होतं.

श्रीलंकेची खराब सुरुवात

श्रीलंकेने आपलं टी 20 वर्ल्ड कप अभियान सुरु केलं आहे. पहिल्याच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. नामीबियाने त्यांना रविवारी हरवलं. नामीबियाने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट गमावून 163 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेची टीम 19 ओव्हर्समध्ये 108 धावांवर ऑलआऊट झाली.