मुंबई: श्रीलंकेचा (Sri lanka) मधल्या फळीतील फलंदाज दीनेश चांडीमल (Dinesh Chandimal) गॉल कसोटीत कमालीची इनिंग खेळला. त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांच मन जिंकून घेतलं. दीनेश चांडीमलने बलाढ्य ऑस्ट्रेलियन (Australia) गोलंदाजीचा सामना करताना, शानदार द्विशतक झळकावलं. दीनेश चांडीमलने या द्विशतकासह एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला. दिनेश चांडीमलने या सामन्यात एक षटकार मारला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दीनेश चांडीमलने मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर जबरदस्त सिक्स मारला. बॉल थेट स्टेडियम बाहेर जाऊन रस्त्यावरुन चालणाऱ्या एका मुलाला लागला.
दीनेश चांडीमलने 179 व्या षटकात मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर मिडविकेटला सिक्स मारला. हा सिक्स इतका लांबलचक होता की, बॉल थेट गॉल स्टेडियमच्या बाहेर गेला. हा चेंडू रस्त्यावरुन मित्रासोबत चाललेल्या एका मुलाच्या पोटात जाऊन लागला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दीनेश चांडीमलने द्विशतक पूर्ण करण्यासाठी मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला. चांडीमल द्वीशतकाच्या जवळ असताना श्रीलंकेच्या नऊ विकेट गेल्या होत्या. त्याने स्टार्कच्या गोलंदाजीवर सिक्स, फोर आणि सिक्स मारुन द्विशतक पूर्ण केलं.
Dinesh Chandimal has torn strips off the Aussie attack, scoring an unbeaten 206* – bringing up his double century with two huge sixes, one of which ended up on the streets of Galle ???
LATEST ? https://t.co/pOShHsRakQ pic.twitter.com/AuBg6KpuIR
— Telegraph Sport (@telegraph_sport) July 11, 2022
श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया मधली ही टेस्ट सीरीज 1-1 अशी बरोबरीत सुटली. पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने 10 विकेटने जिंकला होता. दुसरी कसोटी श्रीलंकेने एक इनिंग आणि 39 धावांनी जिंकली. दिनेश चांडीमलच्या द्निशतकामुळे श्रीलंकेने पहिल्या डावात 554 धावांचा डोंगर उभारला. चांडीमलने 326 चेंडूत 206 धावांची खेळी केली.