लखनौ : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि लखनौ सुपर जायंट्सचा सामना खेळापेक्षा वादामुळे जास्त चर्चेत आहे. या मॅचमध्ये विराट कोहली आणि अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन-उल-हक भिडले. गौतम गंभीर बरोबर सुद्धा विराट कोहलीच वाजलं. महत्त्वाच म्हणजे नवीन उल हकने आपलाच कॅप्टन केएल राहुलची सुद्धा इज्जत ठेवली नाही.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात नवीन उल हक आपला कॅप्टन केएल राहुलने सुद्धा सांगितलेलं ऐकायला तयार नाहीय. व्हिडिओमध्ये केएल राहुल विराट कोहली सोबत उभा आहे. त्याने नवीन उल हकला बोलावलं.
राहुलची काय इच्छा होती?
नवीन उल हकने विराट कोहलीची माफी मागून विषय संपवावा, अशी केएल राहुलची इच्छा होती. पण नवीन उल हकने इन्कार केला. केएल राहुलने नवीन उल हकला बोलावलं. पण त्याने हात हलवून पलटी मारली. राहुल आणि विराट दोघे नवीनकडे पाहत होते, तो काय करतोय ते.
Virat Kohli told Naveen-ul-haq that he is equal to his foot dust.
Kohli Cheap Minded person With Lot of Ego pic.twitter.com/Hj9Q1DODWG— Pari (@BluntlndianGal) May 2, 2023
विराटने नवीनला बूट दाखवले
विराट आणि नवीन उल हक या दोघांपासूनच सर्व वादाची सुरुवात झाली. नवीन बॅटिंग करत असताना, दोघांच भांडण झालं. विराट कोहली आणि नवीन उल हकमध्ये वाद झाल्यानंतर अंपायर्सना मध्यस्थी करावी लागली. त्यावेळी विराटने नवीनकडे पाहून आपले बूट दाखवले.
तिघांना चुकवावी लागली किंमत
मॅच संपल्यानंतर विराट कोहली आणि नवीन उल हकमध्ये पुन्हा वाद झाला. या भांडणानंतर गौतम गंभीर लगेच तिथे आला. त्याने विराट कोहलीला काहीतरी सांगितलं. दोन्ही खेळाडू आक्रमक झाले होते.
त्यानंतर अन्य खेळाडूंनी मध्येपडून दोघांना दूर केलं. या भांडणाचा तिघांवर साइड इफेक्ट झाला. बीसीसीआयने विराट आणि गंभीरच्या मॅच फी मधून 100 टक्के रक्कम कापली.