IPL 2021: आयपीएलला जगातील सर्वात मनोरंजनात्मक क्रिकेट लीग म्हणून ओळखलं जातं. तसंच या स्पर्धेत कधी काय होईल? याचा काही नेम नाही. यावेळी पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला ते म्हणजे स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ ज्याने 5 वेळा आयपीएलचा खिताब पटकावला आहे. तो मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ यंदा प्लेऑफमध्ये जाण्यापासूनही वंचित राहिल अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान मुंबईच्या सततच्या पराभवांमागील कारण त्यांचा प्रशिक्षक झहीर खान (Zahir Khan) याने सांगितलं आहे.
रविवारी कोहलीच्या आरसीबी संघाविरुद्ध (RCB vs MI) झालेल्या सामन्यात मुंबईचा 54 धावांनी पराभव झाला. हा दुसऱ्या पर्वातील सलग तिसरा पराभव असल्यामुळे मुंबईचा संघ तसेच चाहते सर्वच नाराज होते. यावेळी कोच झहीर खान म्हणाला की, ”मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा खेळ चांगला असला तरी त्यांच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट असणारी आक्रमकता अद्याप पाहायला मिळालेली नाही. सर्व खेळाडू एकत्र मिळूनच संघाला जिंकवू शकतात. तशी आक्रमक संघात्मक भूमिका अजून दिसून येत नाही. अशावेळी केवळ चारच सामने मुंबईच्या हातात असल्याने आता पुढील सामने जिंकण अनिवार्य झालं आहे.”
सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सने गोलंदाजी घेतली. पण आरसीबीचे फलंदाज धमाकेदार फलंदाजी करत असल्याने मुंबईला त्यांचा निर्णय़ चुकला असे वाटत होते. पण अखेरच्या षटकात मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी उत्तम बोलिंग करत आरसीबीला 165 धावांवर रोखलं. त्यानंतर मुंबईचे फलंदाज 166 धावा करुन सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरले. सुरुवातही दमदार झाली. सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंंटन डिकॉक यांनी दमदार सुरुवातकेली. पण 57 धावांवर डिकॉक बाद झाला. ज्यानंतर कर्णधार रोहित एकाकी झुंज देत होता. पण रोहित नॉन स्ट्राईकवर असताना ईशान किशनचा बॉल त्याला लागला. ज्यानंतर पुढच्याच चेंडूवर रोहित बाद झाला. 43 धावा करुन रोहित बाद होताच एकामागोमाग एक फलंदाज बाद होतं गेले. पण अखेरच्या काही षटकात क्रिजवर हार्दीक आणि पोलार्ड हे धाकड खेळाडू होते. ज्यांच्यासाठी सामना जिंकवणं अवघड नव्हतं. पण त्याच क्षणी आरसीबीनं त्यांचा हुकमी एक्का काढला.
विजयासाठी मुंबईला 60 धावांची गरज असताना आरसीबीचा यंदाच्या हंगामातील मुख्य गोलंदाज हर्षल पटेलने चेंडू हातात घेतला. तो 17 वी ओव्हर टाकत होता. समोर हार्दीकसह पोलार्ड होता. सिक्सर किंग असणारे दोघेही सामना जिंकवण्याची ताकद मनगटात ठेवून होते. पण हर्षलने जबरदस्त अशा स्लो डिलेव्हरीज टाकत आधी हार्दीकला कर्णधार कोहलीच्या हाती झेलबाद केलं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर पोलार्डची दांडी उडवली. या दोघांच्या जाण्याने मुंबईच्या हातातून सामना जवळपास गेलाच होता. पण तिसऱ्या चेंडूवर हर्षलने राहुल चाहरला पायचीत करत अप्रतिम अशी हॅट्रिक नोंदवली. त्याच्या या हॅट्रिकमुळे आरसीबीला विजय सोपा झाला. पुढील काही शतकात मुंबईचे उर्वरीत फलंदाजही बाद झाले आणि आरसीबीने 54 धावांनी विजय नोंदवला.
– 28 सप्टेंबर (गुरुवार): मुंबई vs पंजाब किंग्स, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी
– 02 ऑक्टोबर (शनिवार): मुंबई vs दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3:30 वाजता, शारजाह
– 05 ऑक्टोबर (मंगळवार): मुंबई vs राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह
– 08 ऑक्टोबर (शुक्रवार): मुंबई vs सनरायजर्स हैद्राबाद, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी
हे ही वाचा
IPL 2021: बलाढ्य सीएसके संघाची कमकुवत बाजू कोणती?, वीरेंद्र सेहवागने सांगितली आतली माहिती
(Due to less aggression Mumbai indians are loosing says Coach Zahir Khan)