दुलीप ट्रॉफीमध्ये तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. बंगळुरुमध्ये इंडिया ए आणि इंडिया बी मध्ये सामना सुरु आहे. अभिमन्यु ईश्वरनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंडिया बी ने पहिली बॅटिंग करताना 321 धावा केल्या. प्रत्युत्तरात शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंडिया ए ने 6 विकेट गमावले आहेत. त्यांचा डाव अडचणीत आहे. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात रियान पराग 30 धावा आणि केएल राहुल 37 रन्स करुन आऊट झाला. दोघाही फलंदाजांनी खराब शॉट खेळून आपला विकेट गमावला. ध्रुव जुरेल 2 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. शिवम दुबे 20 रन्सच करु शकला.
इंडिया बी च्या 321 धावांचा पाठलाग करताना इंडिया ए ने दुसऱ्या दिवशी 66 धावांवर 2 विकेट गमावले होते. रियान पराग आणि केएल राहुल यांनी मिळून गिलच्या टीमला अडचणीतून बाहेर काढलं. दोघांनी 79 धावांची भागीदारी केली होती. दोघे सेट झाले होते. 145 धावा बनवून इंडिया ए मजबूत स्थितीमध्ये होती. तिसऱ्यादिवसाच्या पहिल्या सत्रात एक नवीन वळण आलं. रियान परागकडून मोठ्या इनिंगची अपेक्षा होती. पण दिवसाच्या तिसऱ्याच ओव्हरमध्ये एका खराब चेंडूवर आपला विकेट गमावला. यश दयालचा लेग साइडला टाकलेला चेंडू फ्लिक करताना विकेटकीपर ऋषभ पंतकडे झेल दिला.
KL Rahul never disappoints me 😭 https://t.co/uxymnzgjdD pic.twitter.com/btnc4bwBJZ
— Ctrl C Ctrl Memes (@Ctrlmemes_) September 7, 2024
इंडिया ए अडचणीत
रियान पराग बाद झाल्यानंतर आलेला विकेटकीपर फलंदाज ध्रुव जुरेलही विशेष कमाल दाखवू शकला नाही. 2 रन्सवर त्याला नवदीप सैनीने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्यानंतर राहुल खेळपट्टीवर टिकून होता. शिवम दुबेसोबत त्याने 18 रन्सची भागीदारी केली. राहुल स्वीप शॉट खेळण्याच्या नादात बोल्ड झाला. वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीची लाइन त्याला समजली नाही. 111 चेंडूत त्याने फक्त 37 धावा केल्या. अशा प्रकारे तिसऱ्या दिवशी इंडिया ए चा डाव अडचणी सापडला आहे.