IND vs AUS 3rd ODI : टीम इंडियाला काल ऑस्ट्रेलियाकडून आपल्याच घरात मात खावी लागली. शेवटचा वनडे सामना चेन्नईमध्ये खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने 2-1 ने वनडे सीरीज जिंकली. या पराभवामुळे रोहित अँड कंपनीच्या वर्ल्ड कप तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. ही मालिका सूर्यकुमार यादवसाठी खूपच खराब ठरली. तिन्ही वनडे सामन्यात तो पहिल्या चेंडूवर आऊट झाला. चेन्नईमध्ये तिसऱ्या वनडेत सूर्यकुमार यादवच्या बाबतीत टीम मॅनेजमेंटने जे केलं. त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातय.
रोहित शर्माने सूर्यकुमार यादवला चेन्नई वनडेत सातव्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरवलं. वनडेमध्ये सूर्यकुमार यादव चौथ्या नंबरवर खेळतो. पहिल्या दोन वनडेत सूर्यकुमार यादव शुन्यावर आऊट झाला.
याचा एकच अर्थ निघतो
तिसऱ्या वनडेत त्याच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करण्यात आला. सूर्यकुमार यादवच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करण्याचा अर्थ कुठेना कुठे कॅप्टन आणि टीम मॅनेजमेंटचा त्याच्यावरचा विश्वास डळमळीत झालाय.
आकाश चोपडाने टि्वटमध्ये काय म्हटलय?
सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करण्याचा निर्णय आकाश चोपडाला सुद्धा योग्य वाटला नाही. सूर्यकुमारला तिसऱ्या वनडेमध्ये संधी देणं योग्य होतं. पण त्याच्या बॅटिग ऑर्डरमध्ये बदल करणं चुकीच होतं. “शेवटच्या वनडेत सूर्यकुमार यादवला संधी देणं योग्य होतं. पण त्याला 7 व्या नंबरवर फलंदाजीसाठी पाठवणं चुकीच होतं. तुम्ही कोणासोबत आहात. त्याच्या क्षमतेवर तुमचा विश्वास आहे, तर तुम्हाला ते निर्णयातून दाखवून सुद्धा द्याव लागेल” असं आकाश चोपडाने टि्वटमध्ये म्हटलय.
Playing SKY in the last ODI was the right thing to do.
Sending him at 7 wasn’t.
If you want to back someone and have faith in their abilities, you ought to walk the talk. IMHO. #AakashVani— Aakash Chopra (@cricketaakash) March 23, 2023
सूर्याच्या जागी मग टीम इंडियाकडे काय पर्याय?
सूर्यकुमार यादवने वनडे फॉर्मेटमध्ये जे प्रदर्शन केलय, त्यानंतर त्याच वनडे टीममध्ये राहण कठीण दिसतय. भारतीय टीमला आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर वेस्ट इंडिजमध्ये वनडे सीरीज खेळायची आहे. त्यानंतर आशिया कप आहे. सूर्यकुमार यादव कदाचित भारतीय संघात दिसणार नाही. भारताकडे अनेक पर्याय आहेत. रजत पाटीदार, संजू सॅमसन असे पर्याय टीम इंडियाकडे आहेत.
असा रेकॉर्ड नावावर झालेला पहिलाच खेळाडू
सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिन्ही वनडे मॅचमध्ये शुन्यावर बाद झाला. एका मॅचमध्ये त्याच्या बॅटने बॉलला स्पर्श केला नाही. पहिल्या दोन सामन्यात LBW तर चेन्नई वनडेत क्लीन बोल्ड झाला. सूर्यकुमार यादव क्रिकेट विश्वातील असा पहिला खेळाडू आहे, तो कुठल्या एका सीरीजमध्ये तिन्ही सामन्यात गोल्डन डक बनला.