नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये शनिवारी सामना झाला. 29 एप्रिलच्या संध्याकाळी दिल्लीच्या स्टेडियममध्ये दोन मॅच रंगल्या होत्या. एक मॅच दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबादमध्ये सुरु होती. दुसरा सामना स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरी फॅन्समध्ये रंगला होता. हे दोन्ही सामने जोरदार Action ने भरलेले होते. मैदानाता बॅट-बॉलचा सामना सुरु होता. मैदानाबाहेर प्रेक्षक गॅलरीत लाथा-बुक्क्यांचा सामना रंगलेला.
स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीतील सामन्याचा व्हिडिओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होतोय. IPL 2023 च्या 40 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबादची टीम आमने-सामने होती.
अचानक पळापळ सुरु झाली
दिल्लीच्या स्टेडियममध्ये दोन्ही टीम्समध्ये सामना सुरु असताना, अचानक प्रेक्षकांमध्ये हाणामारी सुरु झाली. एकच गोंधळ उडाला, पळापळ सुरु झाली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय.
हा चित्रपटातला सीन नाही
व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हा कुठल्या चित्रपटातील Action सीन वाटू शकतो. पण असं नाहीय. दोन गटांमधील मारामारीचा हा व्हिडिओ रीलवाला नसून रियल आहे.
अखेर पोलीस मध्ये पडले
या मारामारीत जवळपास 5 ते 6 लोक सहभागी होते. आसपास बसलेल्या लोकांना नेमकं दोघांमध्ये काय होतय, तेच कळत नव्हतं. ही मारामारी सोडवण्यासाठी कोणीमध्ये आलं नाही, अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करुन दोन्ही गटांना शांत केलं. या घटनेत सहभागी असलेल्या सर्वांना पोलीस घेऊन गेले.
A fight took place between fans in Delhi during their match against SRH. pic.twitter.com/MYPj6dqejb
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 30, 2023
मॅचचा निकाल काय लागला?
दिल्लीच्या स्टेडियममधील प्रेक्षक स्टँडमध्ये झालेल्या या लढाईत कोण जिंकलं? कोण हरलं? ते शेवटपर्यंत समजू शकलं नाही. पण क्रिकेटच्या मैदानातील सनराजयर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्समधील लढाई कुठल्याही अडथळ्याशिवाय सुरु राहिली. सनरायजर्स हैदराबादने हा सामना निसटत्या फरकाने 9 धावांनी जिंकला. 8 मॅच खेळल्यानंतर सनरायजर्स हैदराबादने तिसरा विजय नोंदवला.