Cricketer injury : अरे बापरे, हेल्मेट घालूनही मैदानावर तिच्यासोबत घडली मोठी दुर्घटना, VIDEO व्हायरल

| Updated on: Apr 10, 2023 | 2:14 PM

Cricketer injury : क्रिकेटच्या मैदानात अपघात. एका चांगल्या प्लेयरला मैदान सोडाव लागलं. क्रिकेटच्या मैदानात अनेकदा अशा दुर्देवी घटना घडतात. सुदैवाने तिच्या मैदानाबाहेर जाण्याचा टीमला फटका बसला नाही.

Cricketer injury : अरे बापरे, हेल्मेट घालूनही मैदानावर तिच्यासोबत घडली मोठी दुर्घटना, VIDEO व्हायरल
fairbreak invitational tournament
Image Credit source: Screengrab
Follow us on

Cricketer injury : क्रिकेटच्या मैदानात अनेकदा अपघात होतात. यामध्ये खेळाडूंना गंभीर दुखापत होते. क्रिकेटच्या मैदानात रविवारी असच घडलं. हॉन्गकॉन्गच्या कोलूनमध्ये फेयरबेक इन्विटेशनल टुर्नामेंट सुरु आहे. यात बार्मी आर्मी वुमेन्स टीमची कॅप्टन लॉरेन विनफील्ड-हिलला दुखापत झालीय. लॉरेन विनफील्ड-हिल हिच्या चेहऱ्याला बॅटिंग करताना बॉल लागला. लॉरेन चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत होती. तितक्यात अचानक दुर्घटना घडली.

लॉरेन विनफील्ड-हिल सोबत मॅचच्या तिसऱ्या चेंडूवर दुर्घटना घडली. लॉरेनने शामिलिया कॉनेलचा चेंडू लेग साइडला मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडूला अतिरिक्त उसळी मिळाली. त्यामुळे चेंडू लॉरेन विनफील्ड-हिलच्या ग्लोव्हजला लागून लॉरेनचा जबडा तुटला.

‘ती’ वेदनेने विव्हळत होती

लॉरेन विनफील्ड-हिल वेदनेने विव्हळत होती. तिच्या जबड्याला चेंडू लागलेला. तिने मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. तिला रिटायर्ड हर्ट व्हावं लागेल. लॉरेन रिटायर्ड हर्ट झाल्याच नुकसान टीमला झालं नाही. कारण बार्मी आर्मी वुमेन्स टीमने 17 धावांनी मॅच जिंकली. बार्मी आर्मीकडून डिएंड्रा डॉटिनने 48 चेंडूत 69 धावा केल्या. टीमने 163 धावा केल्या. प्रत्युत्तरात वॉरियर्सची वुमेन्स टीम 146 रन्सवर ऑलआऊट झाली.


लॉरेन विनफील्ड-हिल टॉप स्कोरर

लॉरेन विनफील्ड-हिल या टुर्नामेंटमधील बेस्ट बॅट्समन आहे. या खेळाडूने 4 इनिंगमध्ये 100 च्या सरासरीने 200 धावा केल्या आहेत. लॉरेनने 8 एप्रिलला टॉर्नेडोज वुमेन्स टीम विरुद्ध 64 चेंडूत 120 धावा ठोकल्या होत्या. यात 5 सिक्स आणि 17 फोर होत्या.

फेयरब्रेक टूर्नामेंटमध्ये वॉरियर्सची टीम नंबर 1 पोजिशन वर आहे. त्यांचे 5 मॅचमध्ये 15 पॉइंट्स आहेत. बार्मी आर्मी 10 पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. स्पिरिट वुमेन्स तिसऱ्या नंबरवर आहे.