WTC Final 2023 : MI vs GT सामन्यात जे घडलं, त्याचा WTC Final मध्ये ऑस्ट्रेलियाला बसू शकतो फटका

| Updated on: May 27, 2023 | 11:05 AM

WTC Final 2023 : शुभमन गिलची सेंच्युरी नाही, दुसरी एक गोष्ट ज्यामुळे ऑस्ट्रेलियन टीमच्या वाढतील अडचणी. WTC च्या फायनलला अजून 10 दिवस बाकी आहेत. आयपीएल संपल्यानंतर सगळ्यांच लक्ष WTC 2023 फायनलकडे असणार आहे.

WTC Final 2023 : MI vs GT सामन्यात जे घडलं, त्याचा WTC Final मध्ये ऑस्ट्रेलियाला बसू शकतो फटका
Follow us on

अहमदाबाद : IPL 2023 च्या सीजनमधला आता शेवटचा सामना बाकी आहे. काल क्वालिफायर-2 च्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवला. मुंबईवर 62 धावांनी विजय मिळवून गुजरातच्या टीमने फायनलमध्ये प्रवेश केला. आता उद्या अहमदाबादच्या स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध फायनलचा सामना रंगेल. काल गुजरात विरुद्ध मुंबई सामन्यात एक अशी गोष्ट घडली, ज्याचा फटका ऑस्ट्रेलियाला बसू शकतो.

IPL 2023 चा सीजन संपल्यानंतर सगळ्यांच लक्ष असणार आहे, WTC 2023 च्या फायनलवर. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया इंग्लंडमध्ये आमने-सामने असतील.

टीम इंडियाचा कसा फायदा?

ऑस्ट्रेलियन टीमला WTC Final मध्ये फटका बसू शकतो. टीम इंडियाला मात्र याचा फायदा होईल. कालच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर कॅमरुन ग्रीनला दुखापत झाली. मुंबई इंडियन्सची टीम गुजरात टायटन्सच्या धावांचा पाठलाग करत होती, त्यावेळी हार्दिक पांड्याचा 146 Kmph वेगात आलेला चेंडू ग्रीनच्या हाताला लागला. बॉल बसल्यानंतर ग्रीनला त्रास झाला. तो मैदानाबाहेर गेला.

जखमेपेक्षा दुखापत गंभीर ?

तिसरी विकेट गेल्यानंतर कॅमरुन ग्रीन पुन्हा बॅटिंगसाठी आला. त्याने मुंबई इंडियन्स आणि ऑस्ट्रेलियाच्या अपेक्षा निर्माण केल्या. पण कॅमरुन ग्रीनच्या दुखापतीची आता काय स्थिती आहे? या बद्दल माहिती नाहीय. जखमेपेक्षा दुखापत गंभीर असू शकते, असं कॉमेंट्री करणारा केविन पीटरसन म्हणाला.

WTC फायनलला किती दिवस बाकी?

WTC च्या फायनलला अजून 10 दिवस बाकी आहेत. कॅमरुन ग्रीनला झालेली दुखापत गंभीर नसावी, अशी ऑस्ट्रेलियाची इच्छा आहे. हा 23 वर्षीय ऑलराऊंडर खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी महत्वाचा आहे. आयपीएल 2023 च्या सीजनमध्ये कॅमरुन ग्रीनने मुंबईसाठी दमदार कामगिरी केली. त्याने एकूण 452 धावा फटकावताना 6 विकेट काढले.