Urvashi Rautela Video Viral : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला मंगळवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्याला हजर होती. उर्वशी ऋषभ पंतची टीम दिल्ली कॅपिटल्सला सपोर्ट् करण्यासाठी पोहोचली होती. उर्वशी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममधील प्रेक्षक स्टँडमध्ये येताच प्रेक्षकांमध्ये एकच उत्साह संचारला. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्यापेक्षा उर्वशी रौतेलाची चर्चा होतेय.
उर्वशी रौतेला स्टेडियममध्ये दिसताच. काही उत्साही प्रेक्षकांनी ऋषभ-ऋषभ अशी घोषणाबाजी सुरु केली. ऋषभ पंत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच नेतृत्व करतो. मागच्यावर्षाच्या अखेरीस कार अपघातात तो गंभीर जखमी झाला. सध्या ऋषभ रिकव्हरी प्रोसेसमध्ये आहे. 4 एप्रिलला ऋषभ आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये आला होता. उर्वशी रौतेला त्या मॅचच्यावेळी तिथे नव्हती.
ऋषभ-ऋषभच्या घोषणा
उर्वशी मंगळवारी प्रेक्षक स्टँडमध्ये मुंबई विरुद्ध दिल्ली सामना पाहण्यासाठी येताच प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला. लोकांचा जोश पाहण्यासारखा होता. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय.
Audience chanting Rishab Rishab in front of Urvashi #DCvsMI @UrvashiRautela @RishabhPant17 pic.twitter.com/HeA2EPFRuh
— Ashish Chaubey (@ashish_cool1990) April 12, 2023
यात उर्वशी रौतेला पाहून लोक ऋषभ-ऋषभच्या घोषणा देत आहेत. स्टेडियममध्ये उपस्थित उर्वशी रौतेला सुद्धा आनंदी दिसतेय. मॅच दरम्यान तिला डान्स करतानाही पाहिलं. उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये स्टेडियममधले कताही फोटो पोस्ट केलेत.
Urvashi Rautela ? watching #IPL ?? ? 2023 ? Delhi Capitals Vs Mumbai Indians ♥️?
☆#UrvashiRautela #IPL2023 #dcvsmi #MIvsDC
#IPL #Cricket #stadium #DelhiCapitals #mumbaiindians #royalchallengers #PunjabKings pic.twitter.com/jpjpJdPSmb— Urvashi Rautela ❤️ (@AsliUrvashians) April 11, 2023
रात्रभर हॉटेलच्या लॉबीमध्ये वाट पाहत होता
उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत परस्परांना डेट करत असल्याची बातमी मीडियामध्ये आली होती. त्यामुळे दोघांची रिलेशनशिप मीडियात चर्चेतमध्ये आहे. उर्वशी रौतेलाच्या एका मुलाखतीवरुन वाद सुरु झाला होता. उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतच नाव न घेता मुलाखतीत एक वक्तव्य केलं होतं.
RP नावाची व्यक्ती रात्रभर हॉटेलच्या लॉबीमध्ये वाट पाहत होती. त्यावर ऋषभ पंतन नाराजी व्यक्त केली होती. उर्वशी प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करु शकते, असं त्याने म्हटलं होतं. त्यावरुन दोघांमध्ये सोशल मीडियावर बरेच दिवस वादही सुरु होता.