KKR vs GT 2023 : SIX पडताच खवळला हार्दिक पंड्या, बोट दाखवून अफगाणी बॅट्समनला धमकावलं

| Updated on: May 01, 2023 | 10:56 AM

KKR vs GT IPL 2023 : चालू सीजनमधील गुजरात टायटन्सचा आठ मॅचमधील सहावा विजय आहे. एकूण 12 पॉइंट्ससह हार्दिक पंड्याची टीम पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 पोजिशनवर आहे.

KKR vs GT 2023 : SIX पडताच खवळला हार्दिक पंड्या, बोट दाखवून अफगाणी बॅट्समनला धमकावलं
ipl 2023 hardik pandya kkr vs gt
Image Credit source: twitter
Follow us on

कोलकाता : आयपीएलच्या 16 व्या सीजनमध्ये शनिवारी गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये सामना झाला. या मॅच दरम्यान गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्या केकेआरचा ओपनर रहमानुल्लाह गुरबाजसोबत वाद घालताना दिसला. आयपीएलच्या या मॅचमध्ये गुजरात टायटन्सने केकेआरवर आरामात विजय मिळवला. पण हार्दिक आणि गुरबजामधील या वादावादीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

कोलकाताचा विकेटकीपर फलंदाज गुरबाजने इडन गार्डन्सवर तुफानी बॅटिंग केली. त्याने 39 चेंडूत 81 धावा फटकावल्या. गुरबाजने आपल्या इनिंगमध्ये सात सिक्स मारले. गुरबाजने हार्दिकच्या एका चेंडूवर सिक्स मारताच गुजरातचा कॅप्टन खवळला.

नेमकं काय झालं?

13 व्या ओव्हरमधील ही घटना आहे. अफगाणिस्तानचा 21 वर्षीय गुरबाज जोरदार बॅटिंग करत होता. त्याने गुजरातच्या बॉलर्सचा चांगलाचा समाचार घेतला. हार्दिक पंड्याच्या ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर त्याने सिक्स मारला. त्यानंतर हार्दिक चांगलाच संतापला. सिक्स मारल्यानंतर गुरबाज हसत होता आणि काही बोलला सुद्धा. हार्दिकला ती गोष्ट अजिबात आवडली नाही. पुढच्या चेंडूसाठी रनअप घ्यायला जात असताना, तो गुरबाजला बोट दाखवून काहीतरी सांगत होता.


जेसन रॉयच्या जागी मिळालेली संधी

गुरबाजला फॉर्ममध्ये असलेल्या जेसन रॉयच्या जागी टीममध्ये संधी मिळाली होती. त्याने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला. गुरबाजने 39 चेंडूत 81 धावा फटकावल्या. गुरबाजने आक्रमक बॅटिंग केली. त्यामुळे केकेआरने पहिली बॅटिंग करताना स्कोरबोर्डवर 179 धावा केल्या.

गुजरातकडून विजय शंकरने अखेरीस 24 चेंडूत 51 धावा फटकावल्या. त्याआधी शुभमन गिल (49) आणि डेविड मिलर नाबाद (32) धावा यांनी विजयाची पायाभरणी केली.