संसार मोडला, आता Ellyse Perry ‘या’ टीमच्या कॅप्टनला करतेय डेट

| Updated on: Feb 23, 2023 | 2:30 PM

T20 World cup : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू एलिस पेरीचा क्रिकेट विश्वातील शानदार ऑलराऊंडर्समध्ये समावेश होतो. तीन वर्षापूर्वी एलिस पेरीच्या आयुष्यात अशी एक घटना घडली, जिचा त्रास तिला अजून होतो.

संसार मोडला, आता Ellyse Perry या टीमच्या कॅप्टनला करतेय डेट
ellyse perry
Follow us on

T20 World cup : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू एलिस पेरीचा क्रिकेट विश्वातील शानदार ऑलराऊंडर्समध्ये समावेश होतो. ती मीडल ऑर्डरमध्ये कमालीची बॅटिंग करते. त्याशिवाय आपल्या वेगवान गोलंदाजीने टीमला मॅच जिंकून देते. तीन वर्षापूर्वी एलिस पेरीच्या आयुष्यात अशी एक घटना घडली, जिचा त्रास तिला अजून होतो. एलिस पेरीचा 2020 मध्ये घटस्फोट झाला. एलिस पेरीने ऑस्ट्रेलियाचा रग्बी प्लेयर मॅट टाउमा बरोबर लग्न केलेल. वर्ष 2015 मध्ये दोघांनी लग्न केलं होतं. पण त्यांचा विवाह पाच वर्षच टिकला.

एलिस पेरी कोणाला डेट करतेय?

पेरी बरोबर घटस्फोट झाल्यानंतर मॅट टाउमाने फॉरेन्सिक सायकोलॉजिस्ट नाओमी कॅमरनला डेट करायला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर पेरीने सुद्धा मग नवीन सुरुवात केली. एलिस पेरी सध्या फुटबॉल प्लेयर नॅट फाइफला डेट करतेय. फाइफ एलिस पेरीपेक्षा एकवर्षाने लहान आहे. त्याचं ऑस्ट्रेलियात मोठं नाव आहे. नॅट फाइफ ऑस्ट्रेलियन फुटबॉल लीगमध्ये खेळतो. तो फ्रीमेटल फुटबॉल क्लबचा कॅप्टन आहे.

पेरीला RCB ने किती कोटींमध्ये विकत घेतलं?

एलिस पेरीने अजूनपर्यंत तिचं नात सार्वजनिक केलेलं नाही. ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, दोघांना आतापर्यंत अनेकदा एकत्र पाहण्यात आलय. एलिस पेरी सध्या 32 वर्षांची आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये ती खेळतेय. यानंतर ती भारतात सुरु होणाऱ्या WPL टुर्नामेंटमध्ये खेळणार आहे. पेरीला RCB ने 1.70 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं आहे.