मुंबई: इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये 27 जुलैला टी 20 सीरीज मधला पहिला सामना झाला. इंग्लंडने 234 धावा फटकावल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 193 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू ट्रिस्टन स्टब्सने या सामन्यात धुवाधार फलंदाजी केली. आता 4 दिवसानंतर स्टब्सची पुन्हा एकदा चर्चा आहे. यावेळी स्टब्सने जो झेल घेतला, त्यामुळे तो चर्चेत आहे. त्याच्या या कॅचने सर्वांनाच हैराण करुन सोडलं. रविवारी 31 जुलैच्या सामन्यात त्याने हा चकीत करुन सोडणारा झेल घेतला. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड मध्ये सीरीज मधला तिसरा सामना होता. साऊथॅम्पटनच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 191 धावा केल्या. स्टब्सने 4 चेंडूत फक्त 8 धावा केल्या. यावेळी त्याने बॅटिंगने नाही, तर फिल्डिंगने नाव कमावलं. इंग्लंडच्या डावात 10 व्या षटकात स्टब्सने हा जबरदस्त झेल घेतला.
ऑफ स्पिनर एडन मार्करमच्या ओव्हर मध्ये अखेरचा चेंडू डावखुरा फलंदाज मोइन अलीला ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू उसळल्यामुळे बॅटच्या कडेला लागला. चेंडू मिड ऑफला हवेत उडाला. दक्षिण आफ्रिकेचे फिल्डर्स कॅच म्हणून ओरडले. त्यानंतर पुढच्या काही सेकंदाज जे घडलं, त्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.
कव्हर्स मध्ये उभा असलेला स्टब्स काही पावलं धावला व हवे मध्ये डाइव्ह मारुन एका हाताने अप्रतिम झेल घेतला. हा झेल पाहणारे सर्वचजण थक्क झाले.
One of the best catches you’ll ever see ?
Scorecard/clips: https://t.co/kgIS4BWSbC
??????? #ENGvSA ?? pic.twitter.com/FBlAOf3HUM
— England Cricket (@englandcricket) July 31, 2022
मोइन अली सोडा, स्वत: स्टब्सलाही आपल्या या कॅचवर विश्वास बसला नाही. दक्षिण आफ्रिकेचा संघ मोठ्या उत्साहात स्टब्सच्या दिशेने धावला. कॉमेंटेटर्सच्या आवाजातही उत्साह दिसला. स्टेडियम मधील सर्वचजण हा झेल पाहून दंग झाले. स्टब्सने एक आश्चर्यकारक झेल घेतला. इंग्लंडच्या संघाचा डाव 101 धावात आटोपला. त्यांनी 90 धावांनी मॅच जिंकली.