ENG vs SL : पहिल्या दिवशी फक्त 50 टक्के खेळ, इंग्लंडच्या 3 बाद 221 धावा

| Updated on: Sep 07, 2024 | 1:40 AM

England vs Sri Lanka 3rd Test Day 1 Highlights: तिसऱ्या आणि अंतिम सामन्यातील पहिल्या दिवशी खराब प्रकाशामुळे 50 टक्केच खेळ होऊ शकला. इंग्लंडला फक्त 44.1 ओव्हरच बॅटिंग करता आली.

ENG vs SL : पहिल्या दिवशी फक्त 50 टक्के खेळ, इंग्लंडच्या 3 बाद 221 धावा
England Captain Ollie Poop
Image Credit source: England Cricket X Account
Follow us on

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवशी फक्त 44.1 ओव्हरचाच खेळ होऊ शकला. खराब प्रकाशामुळे सामन्यातील बराच वेळ वाया गेला. तिसऱ्या सत्रातही याच कारणामुळे खेळात व्यत्यय आला. त्यानंतर दिवसाचा खेळ संपल्याचं जाहीर करण्यात आलं. इंग्लंडने 44.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 221 धावा केल्या. कसोटी क्रिकेटच्या नियमांनुसार एका दिवसात जास्तीत जास्त 90 षटकांचा खेळ होणं अपेक्षित असतं. मात्र या सामन्यात धड 45 ओव्हरही खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पहिल्या दिवसातील खेळाचा आनंद लुटता आला नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.

इंग्लंडकडून कॅप्टन ओली पोप याने शतक ठोकलं.ओलीच्या कसोटी कारकीर्दीतील ते एकूण सातवं तर कर्णधार म्हणून पहिलं शतकं ठरलं. तसेच ओली यासह क्रिकेट विश्वात पहिली 7 शतकं वेगवेगळ्या संघांविरुद्ध करणारा पहिला फलंदाज ठरला. ओली खेळ थांबवण्यात आला तेव्हा 103 बॉलमध्ये 103 रन्सवर नॉट आऊट होता. ओलीने 100 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. ओलीच्या या खेळीत 13 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. तर हॅरी बूक्र 8 धावांवर नाबाद परतला. डॅनियल लॉरेन्सने 21 चेंडूत 5 धावा केल्या. तसेच जो रुट याने 48 चेंडूत 13 धावा केल्या.

बेन डकेट याला शतक करण्याची संधी होती. मात्र बेन डकेट अपयशी ठरला. बेन डकेटची शतक करण्याची संधी अवघ्या 14 धावांनी हुकली. बेन डकेटने 79 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह 86 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून लहिरु कुमारा याने 2 विकेट्स घेतल्या. तर मिलन रथनायकेला 1 विकेट मिळाली.

पहिला दिवसाचा खेळ आटोपला

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, अँजेलो मॅथ्यूज, कुसल मेंडिस (विकेटकीपर), दिनेश चांदीमल, कामिंडु मेंडिस, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, मिलन रथनायके आणि विश्वा फर्नांडो.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ऑली स्टोन, जोश हल आणि शोएब बशीर.