एडिलेड: T20 वर्ल्ड कप 2022 मधील सेमीफायनलचा दुसरा सामना उद्या होणार आहे. भारत आणि इंग्लंडची टीम आमने-सामने असणार आहे. एडिलेड ओव्हलच्या मैदानात ही मॅच रंगेल. या मॅचआधी इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलरने निर्धार केलाय. त्याने संकल्प केला आहे. निश्चितच बटलरचा हा संकल्प टीम इंडियाच्या कोट्यवधी चाहत्यांना अजिबात आवडणार नाही.
या विधानाचा सरळ सरळ अर्थ असा आहे की…..
टीम इंडियाचे चाहते आतापासून भारत-पाकिस्तान फायनलची स्वप्न पाहत आहेत. त्यांच्यासाठी जोस बटलरने संदेश दिलाय. त्याने प्रण केलाय. काहीही झालं, तरी मी, टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये भारत-पाकिस्तान फायनल होऊ देणार नाही. बटलरच्या या विधानाचा सरळ सरळ अर्थ असा आहे की, उद्या होणाऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडची टीम भारताला धूळ चारेल.
10 नोव्हेंबरला म्हणजे उद्या भारत आणि इंग्लंडमध्ये सेमीफायनलचा दुसरा सामना होणार आहे. क्रिकेटच्या चाहत्यांना भारत-पाकिस्तान फायनल पहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. पण क्रिकेट चाहत्यांच्या या इच्छेवर जोस बटलरला पाणी फिरवायचं आहे.
काहीही झालं तरी मी….
“टीम इंडिया एक मजबूत टीम आहे, याबद्दल कुठलीही शंका नाही. ते सतत चांगलं क्रिकेट खेळतायत. त्यांच्या टीममध्ये डीपनेस आहे. मला काहीही करावं लागलं, तरी चालेलं. मला भारत-पाकिस्तानला फायनलमध्ये बघायच नाहीय. त्यासाठी मला जे करावं लागेल, ते मी करीन” असं बटलर म्हणाला.
इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलरच्या शब्दात किती दम आहे, ते एडिलेडच्या मैदानातच समजेल. भारताविरुद्ध सामना बटलरला जितका सोपा वाटतोय, तसं मात्र नाहीय.