लंडन : ओव्हलच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा 157 धावांनी धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय मिळवला. तब्बल 50 वर्षानंतर भारताने ओव्हलमध्ये इंग्लंडला धुळ चारली. दरम्यान इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन (Naseer Hussain) याने या विजयाचं श्रेय भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला देत त्याच्या एका निर्णयाचं कौतुक केलं आहे.
नासिरच्या मते भारतीय संघाने उत्तम खेळ दाखवलाच पण या सामन्यात विराटने घेतलेले निर्णय अगदी बरोबर ठरले. त्यामुळे भारत विजय मिळवू शकला. यातील एक निर्णय म्हणजे भारतीय संघ खेळवत असलेल्या एकमेव फिरकीपटू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) याला योग्य वेळी गोलंदाजीला उतरवलं जाडेजाने इंग्लंडचे महत्त्वाचे बळी घेत भारताला विजयाच्या दिशेने नेण्यात महत्त्वाचं योगदान दिलं. त्यामुळे नासिरने जाडेजाला खेळवण्यात आलेली वेळ विराटची अगदी बरोबर ठरल्याबद्दल विराटचं कौैतुक केलं.
नासिर इंग्लंडचा कर्णधार जो रुटबद्दल बोलताना म्हणाला ‘रुटचा नेमका तोच निर्णय चूकला जो विराटच बरोबर आला.’ रुटला इंग्लंड संघातून खेळणाऱ्या एकमेव फिरकीपटू मोईन अलीला योग्य ठिकाणी गोलंदाजी देता आली नाही. त्यामुळे अलीच्या फिरकीचा जास्त फायदा इंग्लंडला झाला नसल्याचं नासिर म्हणाला.
ओव्हलच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा 157 धावांनी धुव्वा उडवला. या विजयाने 50 वर्षांनंतर ओव्हलच्या किल्ल्यावर भारताने तिरंगा फडकावला. भारताने 5 कसोटींच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. म्हणजेच आता इंग्लंड दौऱ्यावर गेलेली विराटसेना कसोटी मालिका गमावून माघारी फिरणार नाही, एकतर साहेबांना आस्मान दाखवून परत येईल नाहीतर हम भी किसीसे कम नहीं म्हणत मालिकेत बरोबर करेल…..!
इतर बातम्या
Special Report : इंग्लंड दौऱ्यातही मोठी खेळी नाहीच, अजिंक्य रहाणेचं करिअर संपलं का?
(England cricketer Nasser Hussain tells reason behind indias win how virat played jadeja card so well and root didnt)