न्यूझीलंडने इंग्लंडला आस्मान दाखवलं, माजी कर्णधार म्हणतो, ‘भारतामुळे हे घडलं, तेव्हापासूनच सारा खेळ बिघडला!’

| Updated on: Jun 14, 2021 | 8:33 AM

न्यूझीलंड आणि यजमान इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले आहे. (England Former Captain Michael Vaughan Statement on England vs New Zealand test Series)

न्यूझीलंडने इंग्लंडला आस्मान दाखवलं, माजी कर्णधार म्हणतो, भारतामुळे हे घडलं, तेव्हापासूनच सारा खेळ बिघडला!
न्यूझीलंडने इंग्लंडला हरवलं
Follow us on

मुंबई :  न्यूझीलंड आणि यजमान इंग्लंड (England vs New Zealand) यांच्यातील एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले आहे आणि घरच्या मैदानावर झालेल्या या वाईट पराभवानंतर टीमच्या माजी कर्णधाराचा रोष साहजिक संघाच्या बॅटिंगवर आहे. इंग्लंडला आपल्या नेतृत्वाखाली अॅशेस जिंकवून देणाऱ्या मायकल वॉनने (Michael Vaughan) आपल्या इंग्लंडच्या फलंदाजीबद्दल निराशा व्यक्त केली आहे. अशीच जर बॅटिंग असेल तर आपला संघ अॅशेसमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना करु शकत नाही. तसंच भारताला दोषी धरत, भारत इंग्लंड मालिकेत इंग्लिश संघाने जेव्हा 1-0 ची आघाडी घेतली होती तेव्हापासून सगळा खेळ बिघडला, असं म्हटलं आहे. (England Former Captain Michael Vaughan Statement on England vs New Zealand test Series)

न्यूझीलंडने इंग्लंडला त्यांच्यात भूमीत लोळवलं!

न्यूझीलंड आणि यजमान इंग्लंड यांच्यात एजबॅस्टन येथे दुसरा कसोटी सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या डावात 303 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडने पहिल्या डावात 388 धावा केल्या आणि 85 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर गोलंदाजांनीही चांगलं प्रदर्शन करत दुसर्‍या डावात इंग्लंडच्या फलंदाजांना फारसा टिकाव धरु दिला नाही आणि यजमानांना 122 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर न्यूझीलंडला विजयासाठी केवळ 38 धावा कराव्या लागल्या. न्यूझीलंडने ही कसोटी 8 विकेट्सने जिंकत मालिका देखील 1-0 ने खिशात घेतली.

संघात बदल करण्याची संधी

इंग्लंडला भारताविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे आणि वॉनच्या मते, अॅशेसच्या आधी फलंदाजी सुधारण्यासाठी संघाकडे पाच संधी आहेत. या बॅटिंग लाईनअप सह इंग्लंडची टीम अॅशेस खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये जाऊ शकत नाही. सध्याच्या फलंदाजांची फळी कमकुवत आहे. आता अधिक चांगले खेळाडू शोधले पाहिजेत. खेळाडूंकडे पाहत असताना मला वाटत राहतं की हे चांगला खेळ करण्यास सक्षम आहेत की नाहीत, जर असतील तर ते सारखंच स्वस्तात कसे काय आऊट होतायत.

तेव्हापासून खेळ बिघडलाय!

इंग्लंडला ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारताविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या दोन्ही संघांमध्ये नुकतीच भारतातच कसोटी मालिकेत पार पडली. वॉन म्हणाला, “इंग्लंडने खेळाच्या बाबतीत बरीच छेडछाड केलीय ज्यावेळी संघ भारताच्या दौऱ्यावर गेला होता. ज्यावेळी संघाने भारताविरुद्धच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली तेव्हापासून सगळा खेळच बिघडून गेलाय.

(England Former Captain Michael Vaughan Statement on England vs New Zealand test Series)

हे ही वाचा :

WTC Final : न्यूझीलंडला कसं हरवणार?, अजिंक्य रहाणे म्हणतो, फक्त ‘ते’ 2 शॉट खेळायचे आणि मैदान मारायचं!

WTC Final : न्यूझीलंडने गावस्करांना तोंडावर पाडलं, भारतावर संकट, किवींच्या गोटात आनंद!

ENG vs NZ: इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूच्या नावावर ‘हा’ लाजिरवाणा रेकॉर्ड, न्यूझीलंडकडून 8 विकेट्सने पराभवामुळे ओढावली नामुष्की