मेलबर्न: टी 20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup) चा सुपर 12 राऊंड सुरु होण्याआधी अनेक टीम्सना खेळाडूंच्या दुखापतीचा फटका बसतोय. अनेक टीम्सचे प्रमुख खेळाडू जायबंदी झाले आहेत. टीम इंडियाचे (Team India) दोन प्रमुख खेळाडू जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे वर्ल्ड कपमध्ये खेळत नाहीयत. आता इंग्लंडच्या टीमला दुखापतीचा फटका बसला आहे.
6 फूट 8 इंच लांबीचा हा घातक गोलंदाज
इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज रीस टॉप्ली वर्ल्ड कप बाहेर गेला आहे. फिल्डिंग प्रॅक्टिस दरम्यान टॉप्लीच्या डावा घोटा दुखावला. रीस टॉप्लीच वर्ल्ड कपमध्ये न खेळणं हा इंग्लंडसाठी मोठा झटका आहे. मागच्या काही महिन्यांपासून टॉप्ली चांगल्या फॉर्ममध्ये होता. 6 फूट 8 इंच लांबीच्या या वेगवान गोलंदाजाने 22 टी 20 मॅचमध्ये 22 विकेट घेतल्या.
श्रीलंकेलाही फटका
फक्त इंग्लंडच नाही, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंता चमीरा सुद्धा टी 20 वर्ल्ड कप बाहेर गेला आहे. चमीराला यूएई विरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्याच्याजागी आता कसुन रजीताचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
हे खेळाडू दुखापतीमुळे वर्ल्ड कप बाहेर
जसप्रीत बुमराह, रवींद्र जाडेजा आणि दीपक चाहर हे प्लेयर्स टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर गेलेत. रीस टॉप्लीच्या आधी दुखापतीमुळे इंग्लंडने जॉनी बेयरस्टोला गमावलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ड्वेन प्रिटोरियस सुद्धा दुखापतीमुळे टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर गेलाय. न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन आणइ डॅरिल मिचेल यांना सुद्धा दुखापत झालीय.