लंडन: एकीकडे टी20 विश्वचषक (T20 World Cup) सुरु असला तरी इंग्लंड क्रिकेट संघासाठी विश्वचषका इतकीच मानाची स्पर्धा असणारी अॅशेज सिरीजही जवळ आली आहे. दरम्यान यंदाच्या अॅशेज सीरीज (Ashes 2021) आधी इंग्लंज संघासाठी (England) एक आनंदाची बातमी आली आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) बऱ्याच काळानंतर संघात पुनरागमन करणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) 17 सदस्यीय संघाची घोषणा केली असून या संघात बेन स्टोक्सचं नावही आहे.
मागील काही काळ माणसिक प्रकृती ठिक नसल्याने बेन विश्रांती घेऊन संघाबाहेर होता. याचवेळी त्याच्या बोटाला देखील दुखापत झाली होती. त्यामुळेच टी-20 विश्व चषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेतही बेन खेळत नसून त्याने आयपीएल 2021 च्या दुसऱ्या पर्वातही खेळण्यास नकार दिला होता. पण आता तो संपूर्णपणे फिट असून लवकरच संघात पुनरागमन करणार आहे.
सोमवारी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अॅशेज सिरीजसाठी संघाची घोषमा केली. यावेळी बेन स्टोक्स मैदानावर उतरुन खेळण्यासाठी पूर्णपणे फिट असल्याचं त्यांनी सांगितलं. मेडिकल टीमनेही तो फिट असल्याचं सांगितलं आहे. स्टोक्सच्या परत येण्याने इंग्लंड संघाची ताकदतर वाढेल. पण प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया संघाने मात्र याचा धसका घेतला असणार हे नक्की. कारण स्टोक्सने अनेक सामने त्याच्या जीवावर जिंकवू दिले आहेत. स्टोक्स 4 नोव्हेंबर रोजी संघासोबत सरावासाठी रवाना होईल. आगामी अॅशेज सिरीज 8 डिसेंबर, 2021 रोजी सुरु होणार आहे.
इतर बातम्या
India vs Pakistan : पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार असणाऱ्या शाहीनचं, शाहीद आफ्रिदीशी नातं काय?
India vs Pakistan : पाकिस्तानी खेळाडू आणि विराटच्या मिठीची जगभर चर्चा, Video तुफान व्हायरल
(England star all rounder ben stokes added to ashes squad says ECB)