Joe Root Catch Controversy : ऑस्ट्रेलियन खेळाडूची पुन्हा बेईमानी? शुभमन गिलप्रमाणे जो रुटच्या कॅचवरुन वाद

| Updated on: Jun 30, 2023 | 9:05 AM

Joe Root Catch Controversy : यात एका कॅचवरुन मोठा वाद झाला. हा कॅच पाहून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील शुभमन गिलच्या कॅचची आठवण झाली. ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने बेईमानी केली का? असा प्रश्न आता विचारला जातोय.

Joe Root Catch Controversy : ऑस्ट्रेलियन खेळाडूची पुन्हा बेईमानी? शुभमन गिलप्रमाणे जो रुटच्या कॅचवरुन वाद
England vs Australia Ashes series 2nd Test
Image Credit source: Screenshot/Sonyliv
Follow us on

लंडन : Ashes Series च्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये जोरदार सामना सुरु आहे. लॉर्ड्समध्ये टेस्टच्या दुसऱ्यादिवशी दोन्ही टीम्सची कामगिरी समसमान होती. पण हा दिवस ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने गाजवला. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथने टेस्ट क्रिकेटमध्ये 32 व शतक झळकावलं. इंग्लंडच्या इनिंग दरम्यान त्याने काही चांगले झेल पकडले. यात एका कॅचवरुन मोठा वाद झाला. हा कॅच पाहून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील शुभमन गिलच्या कॅचची आठवण झाली. ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने बेईमानी केली का? असा प्रश्न आता विचारला जातोय.

लॉर्ड्स टेस्टच्या दुसऱ्यादिवशी अखेरच्या सत्रात हा वादग्रस्त झेल घेतला. इंग्लंडची फलंदाजी सुरु होती. त्यांच्याकडून जो रुट आणि हॅरी ब्रूक ही जोडी मैदानात होती. जो रुटला काहीवेळ आधीच जीवनदान मिळालं होतं. कॅमरुन ग्रीनच्या गोलंदाजीवर विकेटकीपरने त्याची कॅच घेतली होती. पण हा चेंडू नोबॉल होता.

झेप घेऊन ही कॅच घेतली

जो रुटला पुन्हा चांगली संधी मिळाली होती. पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने त्याला शॉर्ट चेंडूच्या जाळ्यात फसवलं. मिचेल स्टार्कचा असा शॉर्ट चेंडू रुटने पुल केला. पण टायमिंग बरोबर नव्हता. स्क्वेयर लेगला कॅच गेली. स्टीव्ह स्मिथने पळत जाऊन झेप घेऊन ही कॅच घेतली. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण त्याचा हात जमिनीवर पडताच चेंडू मैदानाच्या गवताला लागलाय असं वाटलं. चेंडू स्मिथच्या बोटांमध्ये होता. त्याने चेंडूवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.


कॅच घेताना बेईमानी?

डाऊट असल्याने या कॅचसाठी तिसऱ्या अंपायरची मदत घेतली. अंपायरन दोन-तीन रिप्ले पाहिल्यानंतर आऊट दिलं. या कॅचवरुन वाद होणं स्वाभाविक होतं. सोशल मीडियावर इंग्लंडच्या फॅन्सनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केलय. बार्मी आर्मीसह अन्य फॅन्स ही बेईमानी असल्याच म्हणतायत.


चीटिंगचे आरोप

या कॅचने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील शुभमन गिलच्या विकेटची आठवण करुन दिली. फायनलच्या दुसऱ्या इनिंगमध्ये शुभमनचा विकेट असाच वादग्रस्त ठरला होता. कॅमरुन ग्रीनने स्लिपमध्ये अशीच कॅच घेतली होती. त्या कॅचवरुन बराच वाद झालेला. ओव्हलच्या मैदानात चीटर-चीटर अशा घोषणा देण्यात आल्या होत्या.