यंदाचा टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सेमीफायनलच्या सामन्यांना सुरुवात झाली असून आज पहिल्या लढतीत ग्रुप 1 मधून आलेल्या इंग्लंडला ग्रुप 2 मधून आलेल्या न्यूझीलंडने मात देत अंतिम सामन्यात एन्ट्री मिळवली आहे. दोन्ही संघाचं यंदाच्या स्पर्धेतील प्रदर्शन तसं उत्तम आहे. त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होणार होता. त्याप्रमाणे झालाच पण अखेरच्या काही षटकात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दमदार फटकेबाजी केली. डॅरेल मिचेलच्या नाबाद 72 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने सामना 5 विकेट्सने जिंकला आहे.
दमदार फटकेबाजी करुन जेम्स निशाम बाद झाला. पण डॅरेल मिचेलच्या नाबाद 72 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने सामना 5 विकेट्सने जिंकला आहे.
जेम्स निशामने अडचणीच्या काळात संघाला सावरत फटकेबाजी सुरु केली आहे. त्याने 9 चेंडूत 26 धावा ठोकल्या आहेत.
इंग्लंडचा चौथा गडी तंबूत परतला आहे. ग्लेन फिलिप्स 2 धावा करुन लियाम लिव्हिंगस्टोनच्या चेंडूवर बाद झाला आहे.
न्यूझीलंडचा डाव सांभाळणारा डेवोन कॉन्वे 46 धावांवर बाद झाला आहे. लियाम लिव्हिंगस्टोनने त्याची विकेट घेतली आहे.
दोन महत्त्वाचे गडी बाद झाल्यानंतर सध्या न्यूझीलंडची धुरा डेवॉन कॉन्वे आणि डॅरिल मिचेलने सांभाळली आहे. 8 षटकानंतर न्यूझीलंडचा स्कोर 45 आहे.
न्यूझीलंडचा सलामीवीर गप्टील बाद झालाच आहे. पण त्यापाठोपाठ फलंदाजीचा कणा असणारा कर्णधार केन विल्यमसनही 5 धावा करुन बाद झाला आहे. ख्रिस वोक्सच्या चेंडूवर आदील राशिदने त्याचा झेल घेतला आहे.
167 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात खराब झाली आहे. त्यांचा सलामीवीर मार्टीन गप्टील 4 धावा करुन बाद झाला आहे.
मोईन अली (नाबाद 52) आणि डेविड मलान (42) यांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने 166 धावांपर्यंत मजल मारली आहे.
महत्त्वाच्या सामन्यात अनुभवी मोईन अलीने अर्धशतक ठोकत एक उत्तम खेळी खेळला आहे. त्याने 36 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह अर्धशतक पूर्ण केलं आहे.
डेविड मलान बाद होताच मोईन अलीने फटेकबाजी सुरु केली आहे. त्याने दोन षटकार ठोकत 40 धावांचा आकडा पार केला आहे.
इंग्लंडकडून उत्तम फलंदाजी करणारा डेविड मलान बाद झाला आहे. 42 धावांवर मलान तंबूत परतला आहे. साऊदीच्या चेंडूवर कॉन्वेने त्याचा झेल घेतला आहे.
डेविड मलान आणि मोईन अलीने इंग्लंडचा डाव सावरला असून इंग्लंडच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. 14 ओव्हरनंतर इंग्लंडचा स्कोर 100 असून मलान 34 तर अली 17 धावांवर खेळत आहे.
इंग्लंडचा फलंदाज डेविड मलान उत्तम फटकेबाजी करताना दिसत आहे. तो उत्कृष्ट चौकार लगावत असून आतापर्यंत त्याने 4 चौकार लगावले आहेत. 28 धावांवर तो खेळत आहे.
10 षटकांटा डाव झाला असून इंग्लंडने 67 धावापर्यंत मजल मारली आहे. सलामीवीर बेयरस्टो आणि बटलर तंबूत परतले असून सध्या मोईन आणि डेविड खेळत आहेत.
इंग्लंडला मोठा झटका बसला असून 50 धावा पूर्ण होताच, त्यांचा महत्त्वाचा खेळाडू असणारा जोस बटलर तंबूत परतला आहे. इश सोढीने त्याला पायचीत केलं आहे.
इंग्लंड संघाचा पहिला गडी बाद झाला आहे. अॅडम मिल्ने यांच्या चेंडूवर कर्णधार केन विल्यमसनने जॉनी बेयरस्टो याचा झेल पकडला आहे.
सलामीला आलेल्या बेयरस्टो आणि बटलर जोडीने चांगली सुरुवात केली आहे. 4 षटकानंतर इंग्लंडचा स्कोर 29 धावा आहे.
भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने आजच्या सामन्याबद्दलचं त्याचं मत एका व्हिडीओद्वारे शेअर केलं आहे.
The semi-finals begin today, and here are my players to watch out for from each of the four teams!
Who do you think will make the biggest impact?
#t20worldcup #EngVsNZ #PakVsAus #sabsebadastadium
– Cheteshwar Pujara (@cheteshwarpujara) 10 Nov 2021
न्यूझीलंडने गोलंदाजी निवडल्यामुळे इंग्लंडचे खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात आले आहेत. जॉनी बेयरस्टोसोबत जॉस बटलर फलंदाजी करत आहे.
इंग्लंड आणि न्यूझीलंडचा संघ आतापर्यंत बऱ्याचदा टी20 सामने खेळला आहे. दोघांनी 21 टी20 सामने खेळले असून इंग्लंडचं पारडं जड आहे. यावेळी इंग्लंडने 13 वेळा तर न्यूझीलंडने 7 वेळा विजय मिळवला आहे. आतापर्यंत एक सामना अनिर्णीत सुटला आहे.
इंग्लंड संघ: जोस बटलर, डेविड मलान, जॉनी बयरस्टो, इयॉन मॉर्गन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम बिलींग्स, मोईन अली, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल राशिद, मार्क वुड
न्यूझीलंड संघ: केन विल्यमसन (कर्णधार), डॅरील मिचेल, मार्टीन गप्टील, जेम्स निशम, डेवॉन कॉन्वे, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, इश सोढी, टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट, अॅडम मिल्ने.
सामन्यात नुकतीच नाणेफेक झाली असून न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय़ घेतला आहे.
Toss update from Abu Dhabi ?
New Zealand have won the toss and elected to field.
Who are you backing in this one?#T20WorldCup | #ENGvNZ | https://t.co/zBjgVLo3T5 pic.twitter.com/vV8IYjVflD
— ICC (@ICC) November 10, 2021